India vs Bangladesh Duleep Trophy 2024 : दुलीप करंडक ट्रॉफी २०२४ मध्ये युवा व अनुभवी खेळाडू टीम इंडियातील जागा पक्की करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत यांना पहिल्या डावात अपयश आले असले तरी त्यांनी दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी करून निवड समितीचे लक्ष वेधले आहे. १९ वर्षीय मुशीर खानने तर १८१ धावांची खेळी करून नाणे खणखणीत वाजवले आहे. आता आणखी एक फलंदाज दम दाखवतोय आणि त्याने आकाश दीपच्या एका षटकात सलग पाच चौकार खेचून निवड समितीला विचार करण्यास भाग पाडले आहे.
भारत ब आणि भारत अ संघातील सामन्यात मुशीर खानच्या १८१ धावांनी सर्वांचे लक्ष वेधले. ७ बाद ९४ अशा धावसंख्येवरून भारत ब संघाने ३२१ धावांपर्यंत मजल मारली. नवदीप सैनीने ५६ धावांचे योगदानही महत्त्वाचे होते. प्रत्युत्तरात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारत अ संघाला २३१ धावाच करता आल्या. मुकेश कुमार व नवदीप सैनी यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. साई किशोरच्या नावावर दोन विकेट्स राहिल्या.
भारत ब संघाच्या पहिल्या डावात सर्फराज खान (९) व ऋषभ पंत ( ७) यांना अपयश आले होते. पण, या दोघांनी दुसऱ्या डावात खणखणीत फलंदाजी केली. ऋषभने ४७ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांची खेळी करून कसोटी संघातील आपला दावा भक्कम केला. त्याचवेळी सर्फराजनेही ३६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४६ धावांची खेळी केली. त्याने आकाश दीपच्या एकाच षटकात सलग पाच चौकार खेचून निवड समितीला त्याचा विचार करण्यास भाग पाडले.
सर्फराजने भारतासाठी ३ कसोटी सामन्यांत ३ अर्धशतकांसह ५०च्या सरासरीने २०० धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४८ सामन्यांत १४ शतकं आणि तितक्याच अर्धशतकांसह ४११२ धावा केल्या आहेत. भारतीय खेळपट्टीवर सर्फराजचा फॉर्म हा टीम इंडियासाठी फायद्याचा ठरू शकतो आणि मधल्या फळीत तो आक्रमक फटकेबाजी करून संघाच्या धावांची गती वाढवू शकतो. त्यामुळे निवड समिती त्याच्या नावाचा नक्की विचार करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.