Indian Premier League 2024: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनसाठी जोरदार तयारी सुरू आहे. अजूनही बऱ्याच फ्रँचायझींचं काहीच ठरलेलं नाही, परंतु त्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी उद्यापर्यंत जाहीर करायची आहे. प्रत्येक फ्रँचायझी जास्तीत जास्त ६ खेळाडू संघात कायम ठेवू शकते.यामध्ये कमाल ५ कॅप्ड आणि दोन अनकॅप्ड असू शकतात.अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवल्यास फ्रँचायझीला त्यांना ४ कोटी द्यावे लागणार आहेत. पण, अनकॅप्ड खेळाडूंपैकी या ५ जणांना लय डिमांड आहे.