Rohit Sharma : एकदिवसीय विश्‍वकरंडकही खेळायचाय : रोहित शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचा ३६ वर्षीय कर्णधार रोहित शर्मा याला आणखी काही वर्षे क्रिकेट खेळायचे आहे.
Rohit Sharma
Rohit Sharmasakal
Updated on

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा ३६ वर्षीय कर्णधार रोहित शर्मा याला आणखी काही वर्षे क्रिकेट खेळायचे आहे. सध्या तरी निवृत्तीचा विचार मनामध्ये नाही. २०२७ मधील एकदिवसीय विश्‍वकरंडक खेळण्याची इच्छा आहे, असे स्पष्ट मत रोहित शर्मा याने यू-ट्युबवरील एका शोमध्ये व्यक्त केले.

Rohit Sharma
IPL 2024 RR vs PKBS : संजू सॅमसनच्या नेतृत्वाची परीक्षा ; मुल्लानपूर येथे राजस्थानचा संघ पंजाब किंग्सशी लढणार

रोहित याप्रसंगी म्हणाला, मी लहानपणापासून एकदिवसीय विश्‍वकरंडकाचा थरार बघतच मोठा झालो आहे. त्यामुळे माझ्यासाठी एकदिवसीय विश्‍वकरंडकच महत्त्वाचा आहे. याशिवाय २०२५ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळायला आवडेल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघ पोहोचायला हवा.

आयुष्यात पुढे काय होईल हे सांगता येत नाही. माझ्याकडून चांगली कामगिरी होत आहे. त्यामुळे सध्या तरी मी निवृत्तीचा विचार केलेला नाही. देशाला एकदिवसीय विश्‍वकरंडक जिंकून द्यायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.