Rohit sharmaला आरसीबीचा कर्णधार करा ! मोहम्मद कैफच्या विनंतीवर पाहा काय म्हणाला RCBचा दिग्गज खेळाडू

Rohit sharma IPL Retention: बीसीसीआयने नवे रिटेंशन नियम जाहिर केल्यानंतर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्समधील स्ठानाबद्दल अनेक अंदाज मांडले जात आहेत.
ab de villiers and rohit sharma
ab de villiers and rohit sharmaesakal
Updated on

AB de Villiers reacts on Rohit Sharma captaincy: गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार आहे, असे वृत्त समोर येत आहेत. अशातच भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने आरसीबीच्या कर्णधारदासाठी रोहित शर्माला कराबद्ध करण्याची आरसीबी व्यवस्थापनाकडे विनंती केली. पण कैफच्या या विनंतीवर आरसीबीचा दिग्गज माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने मिश्किल प्रतिक्रिया दिली.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मेगा लिलाव जवळ येत असताना, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार अशा अनेक बातम्या समोर येत आहेत. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरून काढून टाकले व गुजरात टायटन्स (GT)चा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. परंतु हार्दिकची नियुक्ती करण्याच्या निर्णयावर मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले व चाहत्यांकडू हार्दिकला प्रचंड ट्रोल करण्यात आले .

ab de villiers and rohit sharma
IPL 2025 Auction Explainer: नवा सिजन, नवे नियम... खेळाडूंचं रिटेंशन, RTM कार्डचा वापर अन् १२० कोटींची किंमत; समजून घ्या सर्वकाही

मागच्या आठवड्यात भारतीय नियामक मंडळाने (BCCI) नवे रिटेंशन नियम जाहिर केल्यानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधील स्ठानाबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघ सोडणार अशा बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच, भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू(RCB)ला आयपीएल २०२५ मेगा लिलावादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माला विकत घेण्याची विनंती केली.

कैफच्या या विनंतीवर आरसीबीचा दिग्गज माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने, रोहित आरसीबीकडे जाणे शक्य नाही असे मत व्यक्त केले. " कैफने केलेल्या रोहितबाबतच्या वक्तव्यावर मला हसू आले. जर रोहित मुंबई इंडियन्समधून आरसीबीमध्ये तर ही घटना एखाद्या कथेप्रमाणे असेल. कारण मुंबई काहीही झाले तरी रोहितला संघातून जावू देणार नाही." डीव्हिलियर्स युट्यूबवरील चर्चेदरम्यान म्हणाला.

ab de villiers and rohit sharma
IPL Retention : MS Dhoni अनकॅप्ड खेळाडू, परदेशी खेळाडूंवर बंदीची तलवार... BCCI ने जाहीर केले ८ महत्त्वाचे नियम

डीव्हिलियर्सने आगामी हंगामात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस कायम राहिल असे सांगितले. कोहलीदेखील दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू फाफ डू प्लेसिसला साथ देईल असा तो म्हणाला.

"वय हा फक्त एक आकडा आहे. त्याचे ४० वर्ष वय ही त्याच्यासाठी समस्या नाही. तो काही हगामांसाठी आरसीबीमध्ये आहे आणि खेळाडूंसोबत त्याचे चांगले संबंध तयार झाले आहेत. मला माहित आहे की त्याच्यावर दबाव आहे कारण त्याला आरसीबीसाठी ट्रॉफी जिंकायची आहे. मला वाटते की विराट त्याच्या सर्व अनुभवांसह फाफला पाठिंबा देईल." डीव्हिलियर्स म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.