Ranji Trophy: 15 Sixes! जम्मू-काश्मीरच्या अब्दुल समदने एकाच सामन्यात ठोकल्या दोन सेंच्युरी, मोठ्या विक्रमालाही गवसणी

Abdul Samad Century in Ranji Trophy 2024-25: जम्मू-काश्मीरचा २२ वर्षीय अब्दुल समद रणजी ट्रॉफी गाजवत आहे. त्याने नुकतेच एकाच सामन्यात दोन वादळी शतके करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Abdul Samad | Jammu and Kashmir Ranji Trophy
Abdul Samad | Jammu and Kashmir Ranji Trophy Sakal
Updated on

Ranji Trophy, Jammu and Kashmir vs Odisha: भारतात सध्या रणजी ट्ऱॉफी २०२४ स्पर्धा सुरू असून दुसऱ्या फेरीत जम्मू-काश्मीर आणि ओडिशा संघात सामना सुरू आहे. हा सामना २२ वर्षीय अब्दुल समदने दोन शतकं करत गाजवला आहे. त्याने यासह एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे. कटकमधील बाराबाती स्टेडियमवर हा सामना होत आहे.

पहिल्या डावात समद चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. यावेळी त्याने आक्रमक खेळी करताना ११७ चेंडूत १२७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ९ षटकार मारले.

त्याचबरोबर दुसऱ्या डावातही समदने चौथ्या क्रमांकावर खेळताना आक्रमकच फलंदाजी केली. त्याने दुसऱ्या डावात १०८ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १०८ धावांची खेळी केली. त्यामुळे समद एकाच रणजी ट्रॉफी सामन्यात दोन शतके करणारा जम्मू-काश्मीर संघाचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

Abdul Samad | Jammu and Kashmir Ranji Trophy
Ranji Trophy: ऋतुराज गायकवाड ऑन फायर! अवघ्या ८७ चेंडूत ठोकलं शतक; महाराष्ट्राचं मुंबईविरुद्ध दमदार पुनरागमन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.