वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणारा 'अभिमन्यू'! टीम इंडियात जागा 'डिझर्व्ह' करतो, पण...

Abhimanyu Easwaran cricket Journey सध्याच्या घडीला सर्फराज खानसह टीम इंडियात कोण जागा डिझर्व्ह करत असेल तर तो अभिमन्यू ईश्वरन
Abhimanyu Easwaran Journey
Abhimanyu Easwaran Journey esakal
Updated on

भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवण्यासाठी बरेच खेळाडू रांगेत उभे आहेत. प्लेइंग इलेव्हनमधील एकाने खराब कामगिरी केली, तर त्याला रिप्लेस करणारा दुसरा उभाच आहे. पण, आपल्या संधीची वाट पाहताना खेळाडूंची कारकीर्द देशांतर्गत क्रिकेटमध्येच संपूष्टात आलेली अनेक उदाहरणं आहेत. अमोल मुझूमदार हा ज्या काळात देशांतर्गत क्रिकेट गाजवत होता तेव्हा भारतीय संघात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग यांनी आपली जागा मजबूत करून ठेवली होती. आताचं उदाहरणं द्यायचं झालं तर जलाज सक्सेना हा ऑल राऊंडर देशांतर्गत क्रिकेटपुरताच मर्यादित राहिला. अशी अनेक नावं देता येतील, परंतु आता सध्याच्या घडीला सर्फराज खानसह टीम इंडियात कोण जागा डिझर्व्ह करत असेल तर तो अभिमन्यू ईश्वरन... Abhimanyu Easwaran Life Journey

Mumbai vs Rest Of India या इराणी चषकाच्या सामन्यात अभिमन्यूने १९१ धावांची खेळी करून संघाला मजबूत स्थितीत आणले होते, परंतु ध्रुव जुरेल ( ९३) वगळता त्याला अन्य सहकाऱ्यांची अपेक्षित साथ नाही मिळाली. भारतीय संघ आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करत असताना अभिमन्यू ईश्वरन याला नजरंदाज करून नक्कीच चालणार नाही. २९ वर्षीय अभिमन्यूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी ही बोलकी आहे. त्याने २०१९ मध्ये भारत अ संघाकडून श्रीलंका अ संघाविरुद्ध २३३ धावा कुटलेल्या. त्याच वर्षी त्याने बंगालचे प्रतिनिधित्व करताना पंजाबविरुद्ध नाबाद २०१ धावा, २०२४ मध्ये बिहारविरुद्ध नाबाद २०० धावांची खेळी त्याच्या नावावर आहे. आज त्याने मुंबईने उभा केलेला ५३७ धावांचा डोंगर उभा असतानाही खेळपट्टीवर जम बसवला आणि २९२ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारांसह १९१ धावांची बहारदार खेळी केली. त्याने मारलेल्या प्रत्येक फटक्यात क्रिकेटचे तंत्र दिसले... त्याची फटकेबाजी नेत्रदिपक होती.

Abhimanyu Easwaran
Abhimanyu Easwaranesakal

अभिमन्यूने ९७ प्रथम श्रेणी सामन्यात ४८.४४ च्या सरासरीने २५ शतकं आणि २९ अर्धशतकांसह ७३१५ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ८८ सामन्यांत ३८४७ धावा केल्या आहेत. त्यातही ९ शतकं व २३ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. ट्वेंटी-२०तही त्याच्या नावावर १ शतक आहे. ३४ सामन्यांत ९७६ धावा त्याने केल्या आहेत.

रणजी करंडक स्पर्धेच्या २०१८-१९ च्या हंगामात तो पहिल्यांदा चर्चेत आला, त्याने त्या पर्वात ६ रणजी सामन्यात ९५.६६च्या सरासरीने ८६१ धावा कुटल्या होत्या. त्यात पंजाबविरुद्धच्या द्विशतकाचा समावेश होता. त्यानंतर दुलीप ट्रॉफी फायनमध्ये त्याने शतक झळकावले आणि श्रीलंका अ संघाविरुद्ध द्विशतकीय खेळी केली. २३व्या वर्षी त्याला बंगाल क्रिकेट संघाचा कर्णधार करण्यात आला, परंतु त्या पर्वात त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र, त्याने नेतृत्वकौशल्य दिसले आणि तो संघाला फायनलपर्यंत घेऊन गेला.

Abhimanyu Easwaran
Abhimanyu Easwaranesakal

१९८८ मध्ये देहराडून येथे राहणाऱ्या तमीळ CA ने आपली बालपणाची आवड जपण्यासाठी क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेतला. रंगनाथन परमेश्वरन ईश्वरन असं त्या व्यक्तीचं नाव. त्यांनी अकादमीचं नाव अभिमन्यू असेच ठेवले होते. ७ वर्षांनंतर त्यांना पूत्रप्राप्ती झाली आणि अभिमन्यू असं त्याचं नाव ठेलं गेलं. रंगनाथन यांनाही क्रिकेटपटू बनायचे होते, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना स्वप्न पूर्ण करता आले नाही. पण, त्यांनी हे स्वप्न मुलाचे रुपाने त्यांनी पुन्हा पाहिले. १० वर्षांचा असताना अभिमन्यूच्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात केली. अभिमन्यूला क्रिकेटपटू बनण्यासाठी त्यांनी सर्व सुविधा पुरवल्या. पण, देहरादून येथे राहून त्याचा अपेक्षित विकास होणार नाही, हे त्यांनी जाणले आणि त्यासाठी विविध शहर फिरले. त्यांची ही भटकंती कोलकाता इथे येऊन थांबली. १० वर्षांचा असताना अभिमन्यू घरच्यांपासून दूर कोलकाता येथे राहायला लागला. प्रशिक्षक निर्मल सेनगुप्ता यांच्या घरी तो राहिला आणि क्रिकेटचे धडे गिरवू लागला.

माझे बाबा माझे सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत आहेत आणि सर्वात मोठे टीकाकारही. माझ्या क्रिकेट जीवनात ते आतापर्यंतचा सर्वात मोठा आधार आहेत. ते दरवर्षी काही सामन्यांसाठी यायचे, पण मी कोलकात्यात असताना बहुतेक ते तिथे नसायचे.
- अभिमन्य ईश्वरन ( एका मुलाखतीत केलेलं विधान )

२०१३ मध्ये त्याने वयाच्या १८ वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पुढील पाच वर्षांत त्याने मैदान गाजवाले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान त्याला विराट कोहलीचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळाली. ''आम्ही तोपर्यंत कसोटी टीव्हीवरच पाहिली होती, परंतु मला कोहली, रहाणे व पुजारा यांना कसोटीसाठी सराव करताना पाहण्याची संधी मिळाली. मॅचमध्ये ज्या तीव्रतेने ते खेळतात, तिच तीव्रता सराव सामन्यातही दिसली. तेव्हा थोड्यावेळासाठी का होईना त्यांच्यासोबत मला बोलता आले. तिथून माझा आत्मविश्वास आणखी वाढला. ते प्रेरणादायी होते,''असे अभिमन्यूने सांगितले होते.

Abhimanyu Easwaran
Abhimanyu Easwaranesakal

आता हाच अभिमन्यू टीम इंडियाचे दार ठोठावतोय... भारतीय संघाला आगामी काळात न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर ३ कसोटी सामने आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. अभिमन्यूचा खेळ पाहता त्याला राखीव सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळायला हवं, असं वाटत असलं तरी स्पर्धा खूप आहे. कसोटीत सलामीसाठी रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी त्यांची जागा मजबूत केली आहे. शुभमन गिल हा तिसरा सलामीवीर प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसऱ्या स्थानावर खेळतोय. ऋतुराज गायकवाड हा एक ओपनर शर्यतीत आघाडीवर आहे. त्यामुळे ईश्वरनला संधी मिळण्याची शक्यता जरा कमीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.