11 Fours, 52 Six! गुजरात टायटन्सच्या फलंदाजाची आतषबाजी; IPL 2025 साठी रिटेन करावेच लागणार

IPL 2025 Retaintion : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठीच्या रिटेनशनबाबत बीसीसीआय सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Abhinav Manohar
Abhinav Manoharesakal
Updated on

Gujarat Titans retention for IPL 2025 : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी मेगा ऑक्शनसाठी सर्व फ्रँझायचीझी रणनीती ठरली आहे. BCCI कडे फ्रँचायझी मालकांनी किमान ६ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळावी, अशी केलेली विनंती मान्य होण्याची शक्यता आहे. पण, २५ पैकी ६ खेळाडू निवडता निवडता फ्रँचायझींची दमछाक होणार हे नक्की आहे. ज्यांना रिटेन करता येणार नाही, त्यांना ऑक्शनमध्ये घेऊ, असे आश्वासन द्यावे लागेल. पण, गुजरात टायनटन्सची एका खेळाडूने खरंच डोकेदुखी वाढवली आहे. आयपीएलमध्ये GT ने ज्या खेळाडूला फार संधी दिली नाही, तोच आता त्यांना हवाहवासा वाटू लागला आहे.

केरळमध्ये सुरू असलेल्या Maharaja Trophy 2024 स्पर्धेत Abhinav Manohar चा दबदबा पाहायला मिळतोय. शिवामोंगा लायन्स संघाकडून खेळणाऱ्या अभिनवने महाराजा ट्रॉफी स्पर्धेत १० सामन्यांत ८४.५ च्या सरासरीने ५०७ धावा कुटल्या आहेत. २९ वर्षीय अभिनव आयपीएल २०२२ पासून गुजरात टायटन्ससोबत आहे, परंतु त्याला तितकी संधी मिळाली नाही.

IPL 2025 mega auction नोव्हेंबर महिन्यात होण्याचा अंदाज आहे. अभिनव बिंद्राने महाराजा ट्रॉफीत नाणे खणखणीत वाजवले आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स त्याला आयपीएल २०२५ मध्ये कायम राखू शकतात. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टायटन्सला आयपीएल २०२४ मध्ये फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. हार्दिक पांड्या व मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत GT ला १४ पैकी फक्त ५ सामने जिंकता आलेले आहेत. सलग दोन पर्वात फायनल गाठणाऱ्या गुजरात टायटन्सला मागील पर्वात ७व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

GT ची मॅनेजमेंट नाखूश आहे. साई सुदर्शन व गिल यांना मागील पर्वात काही खास करता आले नाही. अभिमनवला दोन सामन्यांत संधी मिळाली, परंतु तोही अपयशी ठरला. त्यांच्याकडून डेव्हिड मिलर फक्त चमकला. त्याला मधल्या फटकांत अभिनवची साथ मिळाली तर आयपीएल २०२५ मध्ये तो संघासाठी फायद्याचा ठरू शकतो. महाराजा ट्रॉफीत अभिनवने १० सामन्यांत ११ चौकार व ५२ षटकारांची आतषबाजी केली आहे. त्याने सहाह अर्धशतकं झळकावताना ५०७ धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.