Abhishek Sharma: युवराजचं स्वप्नं उतरलं सत्यात, शिष्याची लागली टीम इंडियात वर्णी

India squad for Zimbabwe Tour: बीसीसीआयने आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात युवा अभिषेक शर्मालाही संधी देण्यात आली आहे.
Abhishek Sharma | Yuvraj Singh
Abhishek Sharma | Yuvraj SinghSakal

India squad for Zimbabwe Tour: आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सोमवारी(२४ जून) भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे.

या मालिकेसाठी भारताच्या संघात २३ वर्षीय अभिषेक शर्मालाही संधी मिळाली आहे. त्यामुळे आता अष्टपैलू असलेल्या अभिषेकला भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी या मालिकेदरम्यान मिळू शकते.

डाव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अभिषेकचे गेल्या अनेक दिवसांपासून नाव क्रिकेट वर्तुळात चर्चेत होतं. अभिषेकने नुकतेच आयपीएल २०२४ मध्ये शानदार कामगिरीने सर्वांच लक्ष वेधले होते. त्यामुळे त्यानं याआधीच भारतीय संघाचे दार ठोठावले होते. आता अखेर त्याला संघात संधी मिळाली आहे.

अभिषेक सर्वात आधी प्रकाशझोतात २०१८ साली झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कपवेळी आला होता. हा वर्ल्ड कप जिंकलेल्या युवा भारतीय संघात त्याचाही समावेश होता.

Abhishek Sharma | Yuvraj Singh
T20 World Cup 2024: भारताविरुद्ध कमिन्स साधणार हॅट्रिकची हॅट्रिक? सुपर-8 मधील दोन्ही सामन्यात रचलाय इतिहास

मात्र, नंतर २०२४ च्या सुरुवातीला मॉडेल तान्या सिंगने स्वत:चे जीवन संपवले होते, त्यावेळी या प्रकरणात त्याचंही नाव आलं होतं. परंतु, तो यातून सुखरूप बाहेर आला. त्यानंतर मात्र त्यानं त्याच्या शानदार कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले.

युवराजचा शिष्य

भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगचा अभिषेक शिष्य आहे. युवराज अनेकदा अभिषेकच्या खेळाचेही कौतुक करत असतो. तसेच त्याच्याकडून चूक झाल्यास त्यावर टीका करतानाही त्याने कधी मागेपुढे पाहिलेले नाही.

दरम्यान, अभिषेक गेल्या काही काळापासून पंजाब राज्य संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक देखील आहे. त्याने २०२३-२४ रणजी ट्रॉफी स्पर्धेत तमिळनाडूविरुद्ध एकाच षटकात ५ षटकार मारण्याचा कारनामाही केला होता.

तसेच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत त्याने रियान परागनंतर सर्वाधिक ४८५ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या २ शतकांचा समावेश देखील आहे. तसेच त्यानंतर आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना ट्रेविस हेडबरोबर सलामीची जबाबदारी स्विकारत शानदार खेळ केला होता.

Abhishek Sharma | Yuvraj Singh
Team India: शुभमन गिल टीम इंडियाचा कॅप्टन! 'या' मालिकेसाठी झाली 15 जणांच्या संघाची घोषणा

त्याने आयपीएल २०२४ मध्ये १६ सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांसह ४८४ धावा ठोकल्या होत्या. त्याने ३६ चौकार आणि तब्बल ४२ षटकार मारले. तसेच २ विकेट्सही घेतल्या होत्या. त्याच्याकडे असलेली आक्रमक फलंदाजीची क्षमता आणि गोलंदाजीचे कौशल्य पाहाता, त्याची बरीच चर्चा झाली होती. अखेर त्याला त्याच्या या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे.

अभिषेकने त्याच्या कारकि‍र्दीत २४ प्रथम श्रेणी सामन्यांत १ शतक आणि ५ अर्धशतकांसह १०७१ धावा केल्या आहेत. तसेच त्याने २० विकेट्सही घेतल्या आहेत.

त्याने ५३ लिस्ट ए सामने खळले असून ३ शतकांसह १५४७ धावा केल्या आहेत आणि २९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने १०४ टी२० सामने खेळले असून ३ शतके आणि १६ अर्धशतकांसह २६७१ धावा केल्या आहेत आणि ३२ विकेट्स घेतल्या होत्या.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com