ZIM vs IND 1st T20I : युवराजच्या लाडक्याचा पहिल्याच सामन्यात भोपळा; जगज्जेतेपदानंतर पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव

Riyan Parag, Dhruv Jurel, Abhishek Sharma
Riyan Parag, Dhruv Jurel, Abhishek SharmaX/BCCI
Updated on

ZIM vs IND 1st T20I Abhishek Sharma : झिम्बाब्वेने पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा पराभव करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 115 धावा केल्या. भारताला 20 षटकात 102 धावाच करता आल्या.

भारताची युवा टीम झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली आहे. या संघाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. आजच्या सामन्यात भारताकडून तीन युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी 20 पदार्पण केलं. यात ध्रुव जुरेल, अभिषेक शर्मा आणि रियान परागचा समावेश आहे. युवराज सिंग हा अभिषेकचा मेंटॉर आहे. आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या अभिषेकला चार चेंडूत भोपळाही फोडता आला नाही. याचबरोबर मॅच फिनिशर म्हणून नावारूपाला आलेला रिंकू सिंह देखील एकही धाव न करता माघारी गेला.

Riyan Parag, Dhruv Jurel, Abhishek Sharma
IND vs ZIM: भारताच्या 113 पैकी तब्बल 20 खेळाडूंचं T20I पदार्पण झिम्बाब्वेविरुद्ध, विराट-सॅमसनचाही समावेश; पाहा लिस्ट

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र शुभमन गिलच्या या निर्णयावर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा हा खूश दिसला. गिलने त्याच्या मनासारखा निर्णय घेतला होता.

मात्र सामना जसजसा पुढे सरकू लागला. खेळपट्टी म्हणावी तशी फलंदाजांना पोषक नव्हती. झिम्बाब्वेला 20 षटकात 115 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने झिम्बाब्वेचा निम्मा संघ 74 धावांवर गारद केला होता. त्यानंतर विकेटकिपर क्लिव्हने सर्वाधिक 29 धावा केल्या. भारताकडून रवि बिश्नोईने 4 विकेट्स घेतल्या तर वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स घेतल्या.

Riyan Parag, Dhruv Jurel, Abhishek Sharma
Hardik Pandya-Natasa Stankovic: हार्दिक पांड्या-नताशा स्टॅन्कोविच यांचा घटस्फोट फक्त एक स्टंट? सोशल मीडियावर रंगली चर्चा

भारतासाठी 115 धावांचे आव्हान जरी किरकोळ वाटत असलं तरी खेळपट्टीवर फिरकीपटू चालत होते. त्यामुळे हे आव्हान भारतासाठी देखील सोपे नव्हते. झिम्बाब्वेने भारताचा देखील निम्मा संघ 43 धावात माघारी धाडला. कर्णधार शुबमन गिलने एकाकी झुंज देत 31 धावा केल्या.

मात्र भारताकडून फक्त तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. वॉशिंटन सुंदरने शेवटच्या चेंडूपर्यंत एकाकी झुंज दिली. त्याने 34 चेंडूत 27 धावांची खेळी केली. आवेश खानने 16 धावांचे योगदान दिले.

झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने 3 तर तेंदेईने देखील 3 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.