Abhishek Sharma : 'मला तुझा अभिमान...' आपल्या गुरूचे 'हे' शब्द ऐकून शतकवीर अभिषेक शर्मा झाला भावूक

Abhishek Sharma Video Call To Yuvraj Singh : टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव करत शानदार पुनरागमन केले आहे.
Abhishek Sharma Video Call To Yuvraj Singh
Abhishek Sharma Video Call To Yuvraj Singhsakal
Updated on

Abhishek Sharma IND vs ZIM 2nd T20I : टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव करत शानदार पुनरागमन केले आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने शतक ठोकले, ज्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

अभिषेकच्या कारकिर्दीसाठी हे खूप खास होते, कारण गेल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. त्याचवेळी आता बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिषेक आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. त्यावेळी त्याने त्याचा गुरू युवराज सिंगला व्हिडिओ कॉल केला.

Abhishek Sharma Video Call To Yuvraj Singh
T20 WC Prize Money Split : टीम इंडियामध्ये 125 कोटींची झाली वाटणी.... खेळाडूंपासून ते सिलेक्टरपर्यंत कोणाला मिळणार किती पैसे?

हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात अभिषेकने 47 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीनंतर युवराजने अभिषेकचेही कौतुक केले. युवराज अभिषेकला म्हणाला की, 'शाब्बास, मला तुझा अभिमान आहे. ते यासाठी पात्र आहे. ही तर सुरुवात आहे, असे अनेक डाव अजून यायचे आहेत. अभिषेकने अनेकवेळा युवराज सिंगची कारकिर्दीत मोठी भूमिका असल्याचे सांगितले आहे. आणि बीसीसीआयच्या मुलाखतीदरम्यानही त्यांनी युवराजबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Abhishek Sharma Video Call To Yuvraj Singh
Kuldeep Yadav Marriage : बॉलीवूड सुंदरीच्या प्रेमात पडला कुलदीप यादव? लग्नाबाबत केला मोठा खुलासा

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 13 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. झिम्बाब्वेने 115 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 102 धावाच करू शकला. दुसऱ्या सामन्यात भारताने 234 धावा केल्या होत्या पण झिम्बाब्वे 134 धावांवर ऑल आऊट झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.