R Shridhar
R Shridharesakal

R Sridhar : भारताचा चॅम्पियन 'गुरु' अफगाणिस्तान संघाला मदत करणार; क्रिकेट बोर्डाची घोषणा

R Sridhar as assistant coach for Afghanistan : रामकृष्णन श्रीधर यांच्यावर अफगाणिस्तान क्रिकेट संघाची मोठी जबाबदारी आली आहे. आगामी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी बोर्डाने त्यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
Published on

Afghanistan Cricket Board (ACB) has signed up R Sridhar : टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रामकृष्णन श्रीधर यांची अफगाणिस्तानच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीधर यांनी ७ वर्ष भारतीय संघासोबत काम केलं आहे आणि त्यांच्याकडे अफगाणिस्तान क्रिकेट संघात मोठी जबाबदारी मिळाली आहे. ५४ वर्षीय आर श्रीधर यांची आगामी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघाने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू जॉनाथन ट्रॉट हा संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. आर श्रीधर २०१४ ते २०२१ दरम्यान भारतीय संघासोबत होते. २०१४ मध्ये इंग्लंड मालिकेदरम्यान ते पहिल्यांदा टीम इंडियासोबत दिसले. येथे त्यांनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केले. BCCI ला त्यांचे काम आवडले आणि त्यांचा कार्यकाळ वाढवला गेला. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत काम करण्यातही ते यशस्वी झाले.

भारताच्या सीनियर संघात येण्यापूर्वी आर श्रीधर हे हैदराबाद संघाच्या १९ वर्षांखालील व १६ वर्षांखालील मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. त्यांनी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही ( NCA ) काम केले आहे. श्रीधर हे १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०१४ स्पर्धेत भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. त्याच वर्षी त्यांना आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (सध्या पंजाब किंग्ज) मध्ये सामील होण्याची संधी मिळाली. येथे त्यांनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केले.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने उपांत्य फेरीत धडक मारून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. अफगाणिस्तान-न्यूझीलंड यांच्यातला एकमेव कसोटी सामना ९ सप्टेंबरला नोएडा येथे होणार आहे. बीसीसीआयने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डासाठी नोएडा हे होम ग्राऊंड म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे भारतात त्यांचे सामने होतात. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. १८, २० व २२ सप्टेंबरला हे सामने शाहजाह येथे होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...