Test Cricket : शेवटच्या क्षणी अचानक बदलले कसोटी सामन्याचे ठिकाण! मोठं कारण आलं समोर

सामन्याचे ठिकाण अचानक बदलण्याचे मोठे कारणही समोर आले आहे...
AFG vs IRE Test match shifted to host school sports championship in UAE cricket marathi news
AFG vs IRE Test match shifted to host school sports championship in UAE cricket marathi newssakal
Updated on

Afghanistan vs Ireland Test Venue Shifted : सध्या अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. ज्याचा पहिला सामना बुधवार 28 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. सामना सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले. यापूर्वी हा सामना अबुधाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर होणार होता. त्यानंतर आता हा सामना टॉलरन्स ओव्हलवर खेळला जात आहे. सामन्याचे ठिकाण अचानक बदलण्याचे मोठे कारणही समोर आले आहे.

AFG vs IRE Test match shifted to host school sports championship in UAE cricket marathi news
Ind vs Eng : शेवटच्या कसोटीत संघात मोठे बदल; बुमराहचे पुनरागमन, तर कर्णधार 'या' दोन खेळाडूंना दाखवणार घरचा रस्ता?

खरं तर, अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अबुधाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार होता. मात्र स्थानिक शालेय क्रीडा स्पर्धेमुळे अखेरच्या क्षणी सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले. अबू धाबी स्कूल स्पोर्ट्स चॅम्पियनशिपने आपल्या स्पर्धेसाठी झायेद स्टेडियमची निवड केली होती.

AFG vs IRE Test match shifted to host school sports championship in UAE cricket marathi news
Ind vs Eng : खराब फॉर्म असूनही रजत पाटीदारला BCCI संघातून नाही करणार बाहेर? जाणून घ्या कारण

त्यानंतर अफगाणिस्तान आणि आयर्लंडमधील कसोटी सामना टॉलरन्स ओव्हल स्टेडियममध्ये हलवण्यात आला. आता प्रथमच टॉलरन्स ओव्हलवर आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला जात आहे. आता दुबईच्या झायेद स्टेडियममध्ये प्रेक्षकांची आसनक्षमता 20 हजार आहे, तर टॉलरन्स ओव्हलमध्ये प्रेक्षकांची आसनक्षमता 12 हजार आहे.

नंतर सामन्याचे ठिकाण बदलण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड, क्रिकेट आयर्लंड, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद यांचे अबू धाबी क्रिकेट अँड स्पोर्ट्स हबचे सीईओ मॅट बाउचर यांनी आभार मानले.

टॉलरन्स ओव्हलवर खेळला जाणारा हा कसोटी सामना आयर्लंड क्रिकेट संघासाठी खूप खास आहे. 2018 साली आयर्लंडने कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळवला. त्यानंतर आयर्लंडने एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. आता या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करून आयरिश संघाला पहिल्या कसोटी विजयाची चव चाखायला आवडेल. मात्र, आयर्लंडसाठी ते तितके सोपे असणार नाही. कारण अफगाणिस्तान हा आयर्लंडपेक्षा बलाढ्य संघ मानला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.