जगभरात BCCI ची नाचक्की; AFG vs NZ कसोटी सामन्यादरम्यान धक्कादायक प्रकार; आम्ही पुन्हा इथे येणार नाही, खेळाडूंचा पवित्रा

Afghanistan vs New Zealand Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) मनाचा मोठेपणा दाखवून अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी ग्रेटर नोएडा येथील मैदान उपलब्ध करून दिले खरे... पण...
AFGvsNZ
AFGvsNZesakal
Updated on

Deplorable conditions at the Shaheed Vijay Singh Pathik Sports Complex :

अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातली कसोटी आजही सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. पहिल्या दिवसाचा खेळ ओल्या खेळपट्टीमुळे वाया गेला आणि आजही खेळपट्टी सुकवण्यासाठी शर्यीचे प्रयत्न सुरू आहेत. ग्राऊंड्समन्सना खेळपट्टीवर पडलेले खड्डे बुझवण्यासाठी सरावासाठीच्या खेळपट्टीवरून गवत कापून आणावं लागत आहे, तर खेळाडूंच्या जेवणाची सुविधा पुरवणारे कॅटरर्स टॉयलेटमधून पाणी भरतानाचे फोटो व्हायरल झाले आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या BCCI च्या या सुविधांवर जगभरातून टीका होताना दिसतेय.

शहीद विजयसिंग पथिक क्रीडा संकुलाच्या मैदानावर AFG vs NZ Test होणार आहे. पण, येथील परिस्थिती दयनीय आहे. खराब आउटफिल्ड आणि वाईट सुविधा यामुळे अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील ऐतिहासिक कसोटीचा पहिला दिवस सोमवारी एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द करण्यात आला. रविवारी रात्रभर पाऊस पडल्याने सोमवारी खेळपट्टी ओली होती. आधुनिक सुविधांच्या अभावामुळे मैदान खेळण्यासाठी योग्यरित्या तयार करता आला नाही, त्यात अननुभवी ग्राऊंड स्टाफची धावपळ पाहायला मिळाली. पंचांनी दिवसभरात तब्बल सहावेळा खेळपट्टीची पाहणी केली.

AFGvsNZ
१८१ धावा, तरीही Musheer Khan टीम इंडियात नाही; BCCI ने त्याच्यासाठी आखलाय भारी प्लान

न्यूझीलंडचे अनेक खेळाडू मैदानाची पाहणी करण्यासाठी बाहेर आले, ज्यात कर्णधार टिम साऊदी, अष्टपैलू मिचेल सँटनर आणि रचिन रवींद्र यांचा समावेश होता. कसोटीच्या अगोदर, ग्राउंड स्टाफने अफगाणिस्तानच्या प्रशिक्षण सत्रासाठी मैदान कोरडे करण्यासाठी टेबल पंखे वापरले. याशिवाय पाण्याची कमतरता, वीजपुरवठा आणि महिला स्वच्छतागृहात जावे लागले, आदी गैरसोयींचा खेळाडूंना सामना करावा लागला.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "इथे खूपच गोंधळजनक परिस्थिती आहे. आम्ही येथे ( नोएडा) परत येणार नाही. खेळाडूही येथील सुविधांबाबत नाराज आहेत. आम्ही संबंधित लोकांशी अगोदरच बोललो होतो आणि स्टेडियमच्या लोकांनी आश्वासन दिले होते की सर्वकाही व्यवस्थित असेल. हा सामना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आहे. ही आयसीसीची स्पर्धा आहे आणि आम्हाला अशा गैरसोईचा सामना करावा लागतोय.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.