AFG vs SA 1st ODI : ७ बाद ३६ धावा; अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी आफ्रिकेची लावली वाट, ३३.३ षटकांत पूर्ण संघ तंबूत

Afghanistan vs South Africa ODI : अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं कंबरडं मोडल. आफ्रिकेचे ७ फलंदाज अवघ्या ३६ धावांत त्यांनी माघारी पाठवले अन्...
AFG vs SA 1st ODI
AFG vs SA 1st ODI esakal
Updated on

Afghanistan vs South Africa 1st ODI : अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी बुधवारी गुडघे टेकले. फझलहक फारुकी आणि अल्लाह घाझनफर यांनी भन्नाट मारा करून आफ्रिकेचे ७ फलंदाज अवघ्या ३६ धावांत तंबूत पाठवले. वियान मुल्डरने ( Wiaan Mulder ) आफ्रिकेची लाज वाचवताना संघाला शतकी पार पोहोचवले.. तरी आफ्रिकेचा संपूर्ण संघ ३३.३ षटकांत तंबूत पाठवून अफगाणिस्तानने विक्रम केला. अफगाणिस्तानने प्रथमच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेला ऑल आऊट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.