Rashid Khan: राशिद खानची कसोटी क्रिकेटमधून विश्रांती, न्यूझीलंडविरुद्ध नाही खेळणार

Rashid Khan back surgery: पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे राशिद खानने कसोटी क्रिकेट मधून विश्रांती घेतली आहे.
Rashid Khan
Rashid Khanesakal
Updated on

Rashid Khan Test cricket: अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार राशिद खान कसोटी क्रिकेटमधून विश्रांती घेणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. मागच्या वर्षी त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती आणि खबरदारीचा उपाय म्हणून तो कसोटी क्रिकेट खेळणार नसल्याची बातमी सूत्रांकडून मिळत आहे. राशिद खान अफगाणिस्थान क्रिकेट संघाचा महत्वाचा खेळाडू असून त्याच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तान संघाची कामगिरी पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

"राशिद आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्या पाठीच्या समस्या लक्षात घेऊन कसोटी फॉरमॅटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे," असे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले आहे.

Rashid Khan
'Root' मजबूत! इंग्लंडच्या फलंदाजाचे दमदार शतक; विराट, रोहितसह मोडले अनेकांचे विक्रम

उपचारामुळे तो ९ सप्टेंबरपासून ग्रेटर नोएडा येथे सुरु होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातून राशिदला विश्रांती दिली आहे. राशिद १८ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळू शकतो.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात झालेल्या वने डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाठीवर शस्त्रक्रिया झाल्याने राशिद चार महिने मैदानाबाहेर होता. त्यानंतर झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याने अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व केले होते. तो संघाला उपांत्य फेरीपर्यंत घेऊन गेला होता.

Rashid Khan
Shakib Al Hasan IND vs BAN: शाकिब अल हसनवर हत्येचा गुन्हा; भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी BCB चा मोठा निर्णय

शस्त्रक्रियेनंतर कामाचा ताण कमी करण्याला राशिदने प्राधान्य दिले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला यूकेमध्ये द हंड्रेड स्पर्धेदरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने पुढील सहा महिने ते एक वर्षापर्यंत कसोटी फॉरमॅट न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राशिद संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमुळे अफगाणिस्तान कसोटी संघात पोकळी निर्माण झाली आहे. त्याने पाच कसोटी, १०३ वन डे आणि ९३ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीसाठी अफगाणिस्तानचा प्राथमिक संघ: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झाद्रान, रियाझ हसन, अब्दुल मलिक, रहमत शाह, बहीर शाह महबूब, इक्रम अलिखिल ( यष्टीरक्षक ), शाहीदुल्ला कमाल, गुलबदीन नईब, अफसर झझाई ( यष्टीरक्षक ), अजमातुल्ला उमरझई, झिउरहमन अकबर, शमसुराहमन, कैस अहमद, जहीर खान, निजात मसूद, फरीद अहमद मलिक, नावेद झदरन, खलील अहमद आणि यमा अरब.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.