AFG vs NZ: मुहूर्त काही लागेना! भारतात होणाऱ्या अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशीही सुरुवात नाहीच

Afghanistan vs New Zealand Test: नवी दिल्लीत होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशीही सुरुवात झाली नाही.
Afghanistan vs New Zealand
Afghanistan vs New ZealandSakal
Updated on

Afghanistan vs New Zealand Test: भारतातील ग्रेटर नोएडा येथील शहीद विजयसिंग पथिक क्रीडा संकुलाच्या मैदानावर सोमवारपासून (९ सप्टेंबर) अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी सामना खेळवला जाणार होता. मात्र या सामन्यात पावसाचा मोठा अडथळा आला आहे.

पावसामुळे मैदानच सुकलेले नाही. तसेच सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे खेळण्यासाठी मैदानातील परिस्थिती अद्याप योग्य नसल्याने तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी देखील या सामन्याला सुरुवात होऊ शकलेली नाही.

Afghanistan vs New Zealand
जगभरात BCCI ची नाचक्की; AFG vs NZ कसोटी सामन्यादरम्यान धक्कादायक प्रकार; आम्ही पुन्हा इथे येणार नाही, खेळाडूंचा पवित्रा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.