Afghanistan Women Cricket : अफगाणी महिला क्रिकेटपटू देणार तालिबानला धक्का... आयसीसीकडे केली विशेष मागणी

Afghanistan Women's Cricket : अफगाणिस्तानच्या पुरूष क्रिकेट संघाने दमदार कामगिरी केल्यानंतर आता महिला क्रिकेट संघाने देखील मोठी मागणी केली आहे.
Afghanistan Women's Cricket
Afghanistan Women's Cricketesakal

Afghanistan Women Cricket : अफगाणिस्तानच्या पुरूष संघाने नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत सेमी फायनल पर्यंत मजल मारली होती. इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तानचा सेमी फायनलमध्ये पोहचला होता. या दैदिप्यमान कामगिरीनंतर आता अफगाणिस्तान महिला क्रिकेटपटूंनी आयसीसीकडे एक कळकळीची विनंती केली आहे.

Afghanistan Women's Cricket
Virat Kohli: 'विराटला गोलंदाजांनी वाचवलं, सामनावीर तो नव्हे...' T20 वर्ल्ड कप फायनलनंतर मांजरेकर कडाडले

अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंनी आयसीसीकडे ऑस्ट्रेलियात निर्वासित संघ तयार करण्याची मागणी केली आहे. अफगाणिस्तानच्या 17 माजी महिला क्रिकेटपटूंनी आयसीसीशी संपर्क केला आहे. त्यांनी आयसीसीला विनंती केली आहे की ऑस्ट्रेलियात त्यांचा निर्वासित संघ स्थापन करण्याची मागणी केली आहे.

अफगाणिस्तानच्या माजी महिला क्रिकेटपटूंनी आयसीसी चेअरमन ग्रेग बार्कले यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी निर्वासित संघ म्हणून पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी आर्थिक मदत करण्याची विनंती देखील आयसीसीकडे केली आहे.

Afghanistan Women's Cricket
Mohammad Rizwan : व्यक्ती आजारी असेल तर ऑपरेशन गरजेचं... रिझवानने दिले मोठे संकेत, पाकिस्तान संघात होणार बदल?

अफगाणिस्तानच्या माजी महिला क्रिकेटपटू आपल्या पत्रात लिहितात, 'अफगाणिस्तानच्या माजी महिला क्रिकेटपटू म्हणून आम्हाला पुरूष संघाने टी 20 वर्ल्डकपमध्ये केलेल्या कामगिरीचा अभिमान आहे. आम्ही राशिद खान आणि त्यांच्या संघाचे सेमी फायलनपर्यंत धडक मारल्याबद्दल अभिनंदन करतो.'

'मात्र आमच्या वेदना या कायम आहेत. कराण महिला असल्यानं आम्हाला आमच्या देशाचं प्रतिनिधित्व करता येत नाहीये. आम्ही अफगाणिस्तानच्या माजी महिला क्रिकेटपटू आता विदेशात राहतो.'

'आम्ही अफगाणिस्तान महिला संघाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. आम्ही आयसीसीला विनंती करतो की त्यांनी आम्हाला ऑस्ट्रेलियात निर्वासित संघ स्थापन करण्यासाठी मदत करावी.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com