Afro-Asia Cup Revival : आफ्रिका आणि आशिया यांच्यातील आफ्रो-आशिया चषक स्पर्धा पुन्हा सुरू होणार असल्याची बातमी समोर येत आहे. शनिवारी आफ्रिका क्रिकेट असोसीएशनच्या (ACC) सदस्यांची वार्षिक सभा झाली. या सभेमध्ये आगामी आफ्रो-आशिया कपच्या आयोजनासाठी ६ सदस्यांची प्रभारी समिती नेमण्यात आली आहे.
आशियाई क्रिकेट परिषद (ACC) सारख्या इतर संस्थांपर्यंत पोहोचणे आणि दोन्ही खंडातील खेळाडूंना स्पर्धात्मक संधी मिळण्यासाठी आफ्रो-आशिया कप सारख्या स्पर्धांचे नियोजन करणे, हे या समितीची उदिष्ट आहे.
२००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आणि २००७ मध्ये भारतात, फक्त दोनवेळा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २००९ मध्येही केनियामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, परंतु त्यावेळी ही स्पर्धा होऊ शकली नाही. ही स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यास भारत-पाकिस्तान संघातील खेळाडू एका संघामधून खेळतील.
क्रिकेट व्यतिरिक्त आफ्रो-आशिया चषकामुळे आफ्रिका क्रिकेट असोसीएशनच्या (ACA) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) दोन्हा संस्थेंना आर्थिक फायदा होतो. ACA चे प्रभारी अध्यक्ष तवेंगवा मुकुहलानी, जे झिम्बाब्वे क्रिकेटचे देखील अध्यक्ष आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "आम्ही आफ्रिका क्रिकेट असोसीएशन(ACA) सोबतच आशियाई क्रिकेट परिषदेशीही संवाद साधला. त्यांचीही आफ्रो-आशिया चषक स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची इच्छा आहे.Afro-Asia Cup १७ वर्षानंतर पुन्हा होणार; विराट कोहली पाकिस्तानी खेळाडूंसह एकाच संघात खेळणार