Mohammed Shami Comeback: मोहम्मद शमी गेल्या वर्षभरापासून पायाच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने ' शमी पुर्णत: तंदुरूस्त झाल्याशिवाय त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घेऊन जाऊ शकत नाही', असे वक्तव्य केले. परंतु न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यानंतर शमी एम चिन्नस्वामी मैदानावर भारतीय सहाय्यक प्रशिक्षकांसोबत सराव करताना पहायला मिळाला.
आज भारताने न्यूझीलंडविरूद्धचा पहिला कसोटी सामना गमावला. ज्यामध्ये फलंदाजांसोबत गोलंदाजांनाही अपयश आले. सामना संपल्यानंतर शमी भारतीय सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला. शमीचा हा सरावाचा व्हिडीओ शोशल मीडियावर पहायला मिळत आहे. त्यामुळे शमी नोव्हेंबर मध्ये सुरू होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेमध्ये पुनरागम करणार अशा चर्चाना पुन्हा सुरूवात झाली आहे.
शमी न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु दुखापतीतून पुर्णत: न सावरल्यामुळे न्यूझीलंडविरूद्ध संघातून त्याला वगळण्यात आले. त्यानंतर शमी नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत पुनरागमन करणार अशा चर्चा सुरू झाल्या. भारतीय नियमाक मंडळाचे सचिव यांनी देखील सांगितले होते की, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेमध्ये शमी भारतीय संघचा भाग असेल.
त्यानंतर पुन्हा शमी च्या घुडघ्याला सुज आली आणि पुनरागमनाच्या चर्चांवर पाणी फिरल. त्यात रोहित शर्माने, "शमी पुर्णत: तंदुरूस्त झाल्याशिवाय त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घेऊन जाऊ शकत नाही". असे वक्तव्य केले. त्यामुळे पुनरागमनाच्या चर्चांना पुर्णविराम लागला होता. पण, आता भारतीय प्रशिक्षकांसोबतचा सरावाचा व्हिडीओ पाहून, शमी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत पुनरागमन करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.