हे लैय डेंजर आहे! AI च्या मदतीने Virat Kohli तयार केला Fake Video; शुभमन गिलबाबत म्हणतोय...

Virat Kohli on Shubman Gill Viral Video : क्रिकेटमध्ये 'God' अन् त्याच्यानंतर फक्त मी... विराट कोहलीचा असा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.
Virat Kohli Gill
Virat Kohli Gillesakal
Updated on

Fake video Goes Viral of Virat Kohli : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill) याची तुलना पुढचा विराट कोहली होतेय... गिलची फलंदाजी करण्याची शैली ही विराटसारखी असल्याचा दावा केला जात आहे. भारतीय संघाचा भविष्याचा कर्णधार म्हणून गिलचं नाव आघाडीवर आहे. कोहली नेहमीच गिल आणि इतर तरुण खेळाडूंना पाठिंबा देताना दिसला आहे, परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालं आहे. त्यात विराटचं चित्र काही वेगळंच दिसत आहे. यामध्ये विराट म्हणतोय, मी ज्या प्रसिद्धी शिखरावर आहे, तिथे पोहोचणे अवघड आहे.

विराट म्हणतोय की, ''सातत्य राखणे आणि लिजंड्स बनणे यात खूप मोठा गॅप आहे. मी जेव्हा ऑस्ट्रेलियातून परत आलो, तेव्हा मी स्वतःच्या खेळाचा विचार केला. यशस्वी होण्यासाठी काय करता येईल, याची मी तयारी केली. मी गिलचा खेळ जवळून पाहिला, तो प्रतिभावान आहे, त्यात शंका नाहीच. पण, चांगले खेळणे आणि लिजंड्स बनणे यात खूप मोठा गॅप आहे. गिलची टेक्निक सॉलिड आहे. लोकं त्याला पुढील विराट म्हणत आहेत, परंतु मला हे स्पष्ट करायचे आहे की, विराट फक्त एकच आहे.''

Virat Kohli Gill
डर अच्छा है! Jay Shah यांना १६ पैकी १५ मतं पडली; एक मत कुणी नाही दिलं, हे सांगायला नको

''मी जगातील सर्वात आव्हानात्मक गोलंदाजांचा सामना केला. संघ अडचणीत असताना कसं खेळायचं हे मी अनेकदा अनुभवलं आहे आणि त्यातून विजय मिळवून दिला आहे. मी दशकाहून अधिक काळ सातत्यपूर्ण खेळ केला आहे. तुम्ही काही इनिंग्जमध्ये त्याची पुनरावृत्ती करू शकत नाही. भारतीय क्रिकेटमध्ये गॉड नंतर मीच आहे. गिलला या स्तरावर येण्यासाठी आणखी भरपूर मेहनत घ्यावी लागेल,''असेही त्या व्हिडिओत विराट म्हणतोय.

रोहित, विराट, जसप्रीतला विश्रांती...

कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना दुलीप ट्रॉफीत विश्रांती दिली गेली आहे. त्यावरून संजय मांजरेकर यांनी टीका केली आहे. त्यांनी लिहिले की,“भारताने गेल्या ५ वर्षांत २४९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रोहित त्यापैकी फक्त ५९% खेळला आहे. विराट ६१% आणि बुमराह ३४%. त्यांना आणखी किती विश्रांती हवी आहे. दुलीप ट्रॉफीसाठी त्यांची निवड होऊ शकली असती.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.