Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे सुस्साट! बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ठोकलं दमदार शतक

Ajinkya Rahane Century: अजिंक्य रहाणेने सध्या इंग्लंडमध्ये खेळत आहे. तो चांगल्या फॉर्ममध्येही असून त्याने नुकतेच शानदार शतकही केले.
Ajinkya Rahane
Ajinkya RahaneX/leicsccc
Updated on

Leicestershire vs Glamorgan: भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमध्ये तो लिस्टरशायरकडून खेळत असून त्याने नुकतेच काउंटी क्रिकेटमध्ये शतक केले आहे. त्याच्या या खेळामुळे लिस्टरशायरला ग्लॅमॉर्गनविरुद्ध सामना अनिर्णत राखण्यात यश मिळाले.

रहाणेने कार्डिफला झालेल्या या सामन्यात दुसऱ्या डावात १९२ चेंडूत १०२ धावांची खेळी केली. या खेळीत १३ चौकार आणि १ षटकार मारले. या सामन्यात लिस्टरशायरला पहिल्या डावात २९९ धावांची पिछाडी स्विकारावी लागली होती.

त्यानंतर दुसऱ्या डावात त्यांची अवस्था ७४ धावांवर ३ विकेट्स अशी अवस्था होती. पण अजिंक्य रहाणे आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी डाव सावरताना चौथ्या विकेटसाठी १८३ धावांची भागीदारी केली. या भागीदारी दरम्यान रहाणेने शतक पूर्ण केले.

Ajinkya Rahane
शाब्बास अज्जू! इंग्लंडमध्ये Ajinkya Rahane चा डंका; पहिल्याच मॅचमध्ये धडाकेबाज खेळी, Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.