अज्जू इंग्लंडचं मैदान गाजवतोय; Ajinkya Rahane ने संघाला पोहोचवलं सेमीफायनलमध्ये, Video

Ajinkya Rahane scores half-century for Leicestershire: अजिंक्य रहाणेला आगामी दुलीप ट्रॉफीसाठी संधी देण्यात आलेली नाही. पण असं असतानाच तो इंग्लंडमध्ये दमदार फलंदाजी करताना दिसत आहे.
Ajinkya Rahane | One Day Cup 2024
Ajinkya Rahane | One Day Cup 2024Sakal
Updated on

Ajinkya Rahane Fifty: सप्टेंबरमध्ये होणाऱ्या दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेसाठी बीसीसीआयने चारही संघांची घोषणा केली आहे. पण चारही संघामध्ये फलंदाज अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद झाले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशात रहाणे सध्या इंग्लंडमध्ये लीसेस्टरशायर क्रिकेट खेळत असून चांगल्या फॉर्ममध्येही आहे. तो सध्या वनडे कप स्पर्धा तिथे खेळत आहे. या स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात हॅम्पशायरविरुद्ध खेळताना त्याने लीसेस्टरशायरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आणि संघाला उपांत्य फेरीत पोहचवून दिले.

Ajinkya Rahane | One Day Cup 2024
Team India: रहाणे-पुजारासाठी दरवाजे बंद, तर श्रेयस अय्यर-इशान किशनचे होणार कसोटीत पुनरागमन? BCC ने दिले संकेत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.