Amol Kale Funeral: भारतीय क्रिकेटला दोन दिवसांपूर्वी मोठा धक्का बसला. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी (१० जून) हृदयविकाराच्या झटक्याने न्युयॉर्क येथे निधन झाले. त्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
४७ वर्षीय अमोल काळे टी२० वर्ल्ड कप २०२४ मधील सामने पाहण्यासाठी न्युयॉर्कला गेले होते. त्यांनी एमसीएच्या पदाधिकाऱ्यांसह रविवारी (९ जून) न्युयॉर्कला झालेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाही पाहिला होता. मात्र, त्यानंतर सोमवारी सकाळीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
यानंतर बुधवारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले होते. त्यांचे पार्थिव दुपारी वानखेडे स्टेडियमवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेतेल.
याशिवाय अनेक मंत्रीही अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. मुळचे नागपूरचे असणारे अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात होते.
अमोल काळे यांचे पार्थिव संध्याकाळी अंत्यविधीसाठी सांताक्रुझ येथील स्मशानभूमित आणण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.
भारताचे आणि मुंबईचे क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, धवल कुलकर्णी हे देखील अंत्यदर्शनासाठी आले होते. याशिवाय सिनेस्टार सलमान खाननेही अमोल काळे यांच्या अंत्यविधीसाठी सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत हजेरी लावली.
अमोल काळे यांच्या निधनाबद्दल बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यासह सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली होती.
अमोल काळे हे ऑक्टोबर 2022 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले होते. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत माजी भारतीय क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा 25 मतांनी पराभव केला होता आणि हे अध्यक्षपद मिळवले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.