Akash Deep | Duleep Trophy
Akash Deep | Duleep TrophySakal

Video: बांगलादेश मालिकेसाठी बुमराहचा पर्याय मिळाला; Duleep Trophy त एकाच सामन्यात घेतल्या ९ विकेट्स

Akash Deep 9 Wickets: दुलीप ट्रॉफीच्या पहिल्याच फेरीत ९ विकेट्स घेत आकाश दीपने आपली दखल घ्यायला सर्वांना भाग पाडले आहे.
Published on

Duleep Trophy 2024-25, India A vs India B: भारतात सध्या दुलीप ट्रॉफी ही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पहिल्या फेरीत इंडिया ए विरुद्ध इंडिया बी संघात सामना होत आहे. या सामन्यात इंडिया ए संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप चमकला आहे. त्याने या संपूर्ण सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत.

आकाश दीपने दाखवलेल्या कामगिरीमुळे आता त्याने आगामी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचं दारंही ठोठावलं आहे. १९ सप्टेंबरपासून भारताची बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे.

या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची निवड झालेली नाही. ही निवड येत्या आठवड्यात होऊ शकते.

दरम्यान, या मालिकेत भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याची शक्यता आहे. त्याला या मालिकेसाठी विश्रांती दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जर त्याला विश्रांती देण्यात आली, तर मात्र त्याच्या जागेवर आकाश दीपचा विचार केला जाऊ शकतो.

Akash Deep | Duleep Trophy
Musheer Khan : २१ चेंडूंत कुटल्या ९४ धावा! Duleep Trophy मध्ये मुशीर खानने मोडला तेंडुलकरचा मोठा विक्रम
Loading content, please wait...