Women's T20 world Cup 2024 : लहान असताना आपण एखाद्या व्यक्तीला पाहून भारावून जातो आणि त्याच्या सारखंच व्हायचंय असा विचारही करतो. आपण शाळेत असताना बऱ्याचदा आपल्या अशा स्वप्नाबद्दलही लिहूनही काढतो, पण ते एक स्वप्न असतं आणि कधी खरं होईल की नाही, माहित नसतं. मात्र न्यूझीलंडची २४ वर्षांची अष्टपैलू खेळाडू आहे एमेलिया केर, तिनं असंच पाहिलेलं एक स्वप्न सत्यात उतरलंय.
एमेलिया केर कदाचीत भारतीय चाहत्यांना हे नाव अगदीच नवीन नसेल. वूमन्स प्रीमियर लीग दरम्यान मुंबई इंडियन्स संघाकडून ती खेळताना दिसलीये, अगदी तिला नॅशनल क्रश वैगरे पण अनेकांनी म्हटलंय. पण याच एमेलिया केरने तिच्या अष्टपैलू खेळानं न्यूझीलंडला टी२० वर्ल्ड चॅम्पियन बनवलंय.
तिच्यासाठी वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा आनंद काहिसा भावूकही आहे, कारण तिनं लहानपणी ज्या सोफी डिवाईन आणि सुझी बेट्स यांना पाहुन त्यांच्यासोबत वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्नही तिचं साकारलं गेलं.