WTA Finals: Coco Gauff चे संस्मरणीय विजेतेपद; दहा वर्षांनंतर अमेरिकन खेळाडू विजेती

Coco Gauff Won WTA Finals : चीनची टेनिसपटू झेंग किनवेनला पराभूत करत अमेरिकन टेनिसपटू कोको गॉफने डब्ल्यूटीए फायनल्स विजेतेपद जिंकले.
Coco Gauff
Coco Gauffesakal
Updated on

Coco Gauff Won WTA Finals : कोको गॉफ हिने शनिवारी मध्यरात्री डब्ल्यूटीए फायनल्सच्या विजेतेपदाला गवसणी घातली. तिने अंतिम फेरीच्या लढतीत ऑलिंपिक पदकविजेती झेंग किनवेन हिच्यावर ३-६, ६-४, ७-६ असा तीन सेटमध्ये रोमहर्षक विजय मिळवला आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याची किमया करून दाखवली. याआधी २०१४ मध्ये अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिने डब्ल्यूटीए फायनल्स या स्पर्धेच्या विजेतेपदावर हक्क सांगितला होता. १० वर्षांनंतर कोको गॉफच्या रूपात अमेरिकन महिला खेळाडू विजेती ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.