Vinod Kambli Heath Updates : भारतीय संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी याचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात विनोदला नीट चालताही येत नव्हते आणि त्याला तीन जणांची मदत घ्यावी लागली होती. विनोदचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केले होते आणि अनेकांनी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने त्याची मदत करावी असे आवाहन केले होते. आता विनोदच्या प्रकृतीबाबत आणखी एक अपडेट्स समोर आले आहेत.
विनोद कांबळी तंदुरुस्त आहे आणि त्याने चाहत्यांना सोशल मीडियावर विश्वास ठेऊ नका असे आवाहन केलं आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार विनोदच्या व्हायरल व्हिडीओनंतर त्याचा शाळेतला मित्र रिकी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अम्पायर मार्कस यांनी त्याची घरी जाऊन भेट घेतली. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनीही फोनवरून कांबळीच्या प्रकृतीबाबत विचारणा केली.
''आम्ही जेव्हा त्याला भेटलो तेव्हा तो जॉली मूडमध्ये होता. त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झालेली दिसतेय आणि तो तंदुरुस्त दिसत होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा जुना आहे. त्याचं पोट सुटलेलं नाही आणि तो व्यवस्थित जेवतोय,''असे मार्कस यांनी सांगितले.
विनोद कांबळीने १७ कसोटी ५४.२० च्या सरासरीने १०८४ धावा केल्या आहेत आणि त्यात ४ शतकं व ३ अर्धशतकांचा समावेश आहे. २२७ ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. १०४ वन डे सामन्यांत त्याने २ शतक व १४ अर्धशतकांसह २४७७ धावा केल्या आहेत. शिवाय १२९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३५ शतकं व ४४ अर्धशतकांसह त्याने ९९६५ धावा चोपल्या आहेत. २२१ लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ६४७६ धावा केल्या असून त्यात ११ शतकं व ३५ अर्धशतकं आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.