West Indies vs Sri Lanka: वेस्ट इंडिज पुढील आठवड्यात तीन ट्वेंटी-२० व तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. या मालिकेमधून वेस्ट इंडिजचे अनुभवी खेळाडू आंद्रे रसेल, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर आणि अकेल होसेन यांनी अचानक माघार घेतली आहे. वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका खेळू शकत नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० व वन-डे संघातून त्यांची निवड रद्द केली आहे. तर सलामीवीर एविन लुईस २०२२ च्या वर्ल्ड कपमधील शेवटच्या ट्वेंटी-२० सामन्यानंतर पुन्हा संघात परतणार आहे.
वेस्ट इंडिजचा श्रीलंका दौरा १३ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून तो २६ ऑक्टोबर रोजी समाप्त होईल. या मालिकेतून महत्वाच्या खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमीनी त्यांच्या माघारीमागचे कारण स्पष्ट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी विश्रांती आणि दुखापतीतून सावरण्याची आवश्यकता असण्याच्या कारणांचा त्याने उल्लेख केला आहे.
डॅरेन सॅमीने म्हणाला "श्रीलंका दौऱ्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीत खेळाडूंचे सखोल परीक्षण करण्याची आणि खेळाडूंचे मूल्यांकन करण्याची संधी मिळेल. श्रीलंकेविरुद्ध जोरदार मुकाबला करण्यासाठी आमचा संघ सज्ज आहे. विशेषत: अनेक वरिष्ठ खेळाडू विविध कारणांमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यांना विश्रांती व दुखापतीतून सावरणे आवश्यक आहे."
तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी १७ वर्षीय ज्वेल अँड्र्यूची वेस्ट इंडिज संघात निवड करण्यात आली आहे. वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो सर्वात तरुण वेस्ट इंडियन ठरेल. केवळ डेरेक सीली आणि गॅरी सोबर्स यांनी वयाच्या १७ व्या वर्षी वेस्ट इंडिजसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.
"युवा खेळाडूंचे मूल्यांकन करण्यासाठी आणि उदयोन्मुख खेळाडूंना आमच्या वन-डे संघात संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्वेल अँड्र्यू सारख्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत." सॅमी म्हणाला.
रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, ॲलिक अथानाजे, आंद्रे फ्लेचर, टेरेन्स हिंड्स, शे होप, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोती, शेरफेन रदरफोर्ड, रोमारिओ शेफर्ड, शामर स्प्रिंगर
शे होप (कर्णधार), अल्झारी जोसेफ (उपकर्णधार), ज्वेल अँड्र्यू, ॲलिक अथानाझे, केसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोती, शेरफेन रदरफोर्ड, जेडन सील्स, रोमारिओ शेफर्ड, हेडन वॉल्श
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.