England Cricket: इंग्लंडची मोठी घोषणा! दिग्गज अष्टपैलूकडे सोपवली अ संघाच्या हेड कोचची जबाबदारी

New Head Coach: इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफ आगामी काळात एका नामांकित संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून पहायला मिळेल.
Andrew Flintoff
Andrew Flintoffesakal
Updated on

Andrew Flintoff: इंग्लंडने नुकतेच ब्रेंडन मॅक्युलमची कसोटीबरोबर आता वनडे आणि ट्वेंटी-२० क्रिकेटसाठीही इंग्लंडच्या पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. आता यानंतर इंग्लंडसाठी ७९ कसोटी आणि १४१ वन-डे सामने खेळणारा अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफला इंग्लंड लायन्सचे (इंग्लंड अ संघ) मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे.

ऑक्टोबरमध्ये इंग्लंड लायन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून तो नवीन भूमिकेची जबाबदारी सांभाळण्यास सुरू करेल. तो सध्या ओव्हल येथे श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटीसाठी सपोर्ट स्टाफमध्ये सहभागी आहे. या सामन्यापूर्वी शुक्रवारी त्यानेच जोश हलला इंग्लंडकडून पदार्पणाची कॅप दिली.

जवळचा मित्र आणि व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांच्या मदतीने, फ्लिंटॉफने राष्ट्रीय संघासह अनेकदा मार्गदर्शकाच्या भूमिका स्वीकारल्या आहेत आणि २०२३ च्या कॅरिबियन दौऱ्यात आणि ट्वेंटी-२० विश्वचषकादरम्यानही फ्लिंटॉफने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

Andrew Flintoff
Cricketer Retirement: 'माझी ऑस्ट्रेलियाविरुद्ध निवड झाली नाही अन्...', दिग्गज अष्टपैलूने अचानक घेतली निवृत्ती

"इंग्लंड लायन्ससोबत मुख्य प्रशिक्षकाची भूमिका साकारण्यासाठी मी खुप उत्सुक आहे. देशातील काही उभरत्या खेळाडूंसोबत काम करण्याची आणि इंग्लंड क्रिकेटचे भविष्य घडविण्यात मदत करण्याची ही एक विलक्षण संधी आहे."

'लायन्स संघ हा आंतरराष्ट्रीय यशासाठी प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंसाठी नेहमीच महत्त्वाचा पर्याय राहिला आहे आणि त्या प्रवासाचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो," असे फ्लिंटॉफ म्हणाला.

"इंग्लंडमधील खेळाचे भवितव्य उत्तम आहे. तिथे अनेक प्रतिभाशाली खेळाडू उदयास येत आहेत आणि मी या खेळाडूंना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यास उत्सुक आहे."

Andrew Flintoff
'लाज वाटते...', पाकिस्तानच्या बांगलादेशविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर माजी कर्णधार संतापला

इंग्लंड क्रिकेट बोर्ड(ECB)चे संचालक एड बार्नी म्हणाले, "अँड्र्यू फ्लिंटॉफचे या प्रमुख भूमिकेत स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. अँड्र्यूचे प्रेरणादायी नेतृत्व राहिले असून त्याला प्रशिक्षक कौशल्य आणि खेळाची सखोल समज आहे. त्याच्या राष्ट्रीय संघातील प्रशिक्षणाचा फायदा लायन्सला नक्कीच होईल."

"इंग्लंड लायन्स हा संघ इंग्लंड क्रिकेटचा एक आधारस्तंभ आहे, जो पुढच्या पिढीच्या प्रतिभेला जोपासण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अँड्र्यूच्या मार्गदर्शनाने, सर्वोच्च संभाव्य खेळाडू विकसित होत राहतील आणि त्यांच्या खेळाला नवीन स्तरावर घेऊन जातील," असे एड बार्नी पुढे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.