AUS W vs SA W 2024
AUS W vs SA W 2024ESakal

AUS W vs SA W: गतविजेता ऑस्ट्रेलिया 15 सामन्यानंतर मोक्याच्या क्षणी हरला; दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला

AUS W vs SA W 2024: गतविजेता ऑस्ट्रेलियाला 15 सामन्यानंतर हार मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेने 8 धावांनी पराभव केला आहे.
Published on

AUS W vs SA W 2024: ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने 20.0 षटकात 5 विकेट गमावत 134 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने 17.2 षटकांत 2 बाद 135 धावा केल्या आहेत.

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत आफ्रिकेने प्रथमच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. महिला T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना शुक्रवारी (18 ऑक्टोबर) न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज महिला संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (20 ऑगस्ट) दुबईत होणार आहे.

AUS W vs SA W 2024
IND vs NZ: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व बदलाचा फैसला झाला! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

यावेळी महिला टी-20 विश्वचषकात असे काही घडले आहे, जे यापूर्वी 2009 च्या मोसमात घडले होते. वास्तविक, 2009 पासून आतापर्यंत 8 महिला टी-20 विश्वचषक झाले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने 6 जिंकले आहेत. एकदा 2016 च्या मोसमाच्या अंतिम फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 2009 च्या मोसमात ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीत पराभूत होऊन बाहेर पडला होता. यानंतर कांगारू संघ अंतिम फेरीत पोहोचू शकलेला नसताना दुसऱ्यांदा असे घडले आहे. यावेळी चोकर्स नावाच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इतिहास रचला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.