Virat Kohli Son Citizenship : इंग्लंड की भारत! अनुष्का -विराटच्या मुलाला कुठे मिळणार नागरिकत्व? जाणून घ्या नियम

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा 15 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत.
Virat Kohli Son Citizenship Marathi News
Virat Kohli Son Citizenship Marathi Newssakal
Updated on

Anushka Sharma-Virat Kohli Son Citizenship : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा 15 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. अनुष्काने एका लाडक्या मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव अकाय ठेवले. या जोडप्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे लोकांना त्यांच्या मुलाच्या जन्माची माहिती दिली होती. यासगळ्या दरम्यान लोकांना प्रश्न पडला आहे, विराट कोहलीचा आणि अनुष्का शर्माचा मुलगा अकायचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यामुळे त्याला कोणत्या देशाचे नागरिकत्व मिळणार.

Virat Kohli Son Citizenship Marathi News
Ing vs Eng : चौथ्या कसोटीत Playing 11 मध्ये होणार मोठे बदल! 'या' खेळाडूला पहिल्यांदाच मालिकेत खेळण्याची मिळणार संधी

नियमांनुसार, अकाय ब्रिटिश नागरिक होणार नाही. यूकेमध्ये जन्म घेतल्यास आपोआप नागरिकत्व मिळत नाही. कारण तेथील नागरिकत्व मिळविण्यासाठी पालकांपैकी किमान एक ब्रिटिश नागरिक असणे आवश्यक आहे, किंवा मुलाचे पालक तेथे दीर्घकाळ राहत असावेत.

Virat Kohli Son Citizenship Marathi News
Shreyas Iyer : खोटं बोलला श्रेयस अय्यर? फिटनेसवर NCA केला मोठा खुलासा

त्याचप्रमाणे, जर ब्रिटीश नागरिकत्व असलेल्या व्यक्तिचा मुलगा यूकेच्या बाहेर जन्मला तर त्याला ब्रिटिश नागरिकत्व मिळते. अनुष्का-विराटचा मुलगा अकायचा जन्म लंडनमध्ये झाला असूनही त्याच शहरात त्याच्या आई-वडिलांची मालमत्ता असली तरी त्याला ब्रिटीश नागरिकत्व मिळणार नाही. त्याच्याकडे ब्रिटनचा पासपोर्ट असला तरी अकायला भारतीय नागरिक म्हणून मान्यता दिली जाईल. कारण विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही भारतीय नागरिक आहे.

विराट कोहलीने 2017 मध्ये अनुष्का शर्मासोबत लग्न केले होते. दोघांनी लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट केले. विराट सध्या भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचा भाग नाही. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या मालिकेतून सुट्टी घेतली.

या अनुभवी फलंदाजाने भारतासाठी 113 कसोटी, 292 एकदिवसीय आणि 117 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 8848, 13848 आणि 4037 धावा केल्या आहेत. पहिल्या तीन सामन्यांनंतर भारत इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने आघाडीवर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.