Arjun Tendulkar in CSK : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी २४-२५ नोव्हेंबरला मेगा ऑक्शन होणार आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या पाच खेळाडूंना संघात कायम राखले आहे. त्यांनी अर्जुन तेंडुलकरला रिलीज केले आहे. २५ वर्षीय अर्जुनला मागील पर्वात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करताना दोन सामने खेळला होता. त्याला फआर संधी मिळाली नाही. पण, अर्जुनला मेगा ऑक्शनमध्ये काही ४ मोठे संघ आपल्या ताफ्यात घेऊ शकतील. मुंबई इंडियन्स त्याला पुन्हा एकदा संघात सामील करेल अशी शक्यता आहे.