हैदराबाद, ता. २३ ः अर्निश कुलकर्णी आणि अंकित बावणे यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर महाराष्ट्राने मुश्ताक अली राष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धत नागालँडचा सहा विकेटने पराभव केला. .प्रथम फलंदाजी करणाऱ्या नागालँडला २० षटकांत ४ बाद १५० धावांत रोखल्यानंतर महाराष्ट्राने हे आव्हान १५.१ षटकांत चार फलंदाजांच्या मोबदल्यात पार करुन सरासरीही मोठ्या प्रमाणात उंचावली. .Kung Fu Pandya! हार्दिक पांड्याचा ट्वेंटी-२०त भीमपराक्रम; असा विक्रम करणारा पहिला भारतीय.महाराष्ट्राचा सलामीवीर अर्निश कुलकर्णीने ३९ चेंडूत ६२ धावा केल्या त्यानतंतर तो जखमी निवृत्त झाला. त्यानंतर अंकित बावणेने नाबाद ७२ धावांची खेळी केली. महाराष्ट्राचे नेतृत्व करत असलेला राहुल त्रिपाठी याला केवळ पाचच धावा करता आल्या. .त्या अगोदर महाराष्ट्राने सात गोलंदाज वापरले. नागालँडचा सलामीवीर शांफरी तेरंग याने २० षटके खेळून नाबाद ५९ धावा केल्या परंतु त्यासाठी त्याने ५६ चेंडू घेतले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या जगदीशा सुचितने ८ चेंडूतच नाबाद २२ धावांचा तडाखा दिल्यामुळे त्यांना दीडशे धावा करता आल्या. .संक्षिप्त धावफलक ः नागालँड २० षटकांत ४ बाद १५० (शांफरी तेरंग नाबाद ५९ - ५६ चेंडू, ५ चौकार, २ षटकार, चेतन बिस्त ३५ - २४ चेंडू, २ चौकार, २ षटकार, जगदीशा सुचित नाबाद २२ - ८ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, मुकेश चौधरी ३-०-२०-२, अर्निष कुलकर्णी ३-०-२४-१, प्रशांत सोळंकी ३-०-२६-१) पराभूत वि. महाराष्ट्र ः १५.१ षटकांत ४ बाद १५१ (अर्निश कुलकर्णी निवृत्त ६२ - ३९ चेंडू, ८ चौकार, २ षटकार, अंकित बावणे नाबाद ७३ - ४२ चेंडू, १० चौकार, २ षटकार, दीप बोराह ३-०-२४-२) .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.