WPL 2024: शेवटच्या बॉलवर मुंबई इंडियन्सचा पराभव, शोभनाचं सेलिब्रेशन अन् चाहत्यांना झाली सूर्याची आठवण, Video व्हायरल

Asha Sobhana Celebration: वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला.
Asha Sobhana celebration | Suryakumar Yadav | WPL 2024
Asha Sobhana celebration | Suryakumar Yadav | WPL 2024Sakal
Updated on

WPL 2024 Eliminator, RCB vs MI: वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत शुक्रवारी (15 मार्च) एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. या सामन्यात बेंगलोरने अखेरच्या चेंडूवर 5 धावांनी विजय मिळवला. अखेरच्या दोन षटकात सोफी मोलिनेक्स आणि आशा शोभना यांनी चांगली गोलंदाजी केली.

दरम्यान, बेंगलोरच्या विजयानंतर आशा शोभनाने जे सेलिब्रेशन केले, ते पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांना 2020 आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादवने केलेल्या सेलिब्रेशनची आठवण झाली.

झाले असे की बेंगलोरने दिलेल्या 136 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या दोन षटकात मुंबईला 16 धावांची गरज होती. यावेळी 19 व्या षटकात मोलिनेक्सने अवघ्या 4 धावा देताना एस सजनाला बाद केले.

Asha Sobhana celebration | Suryakumar Yadav | WPL 2024
WPL 2024 : 'मी आऊट झाल्यानंतर...' पराभवानंतर हरमनप्रीतने सांगितले कुठे झाली चूक

त्यामुळे शेवटच्या षटकात मुंबईला 12 धावांची गरज होती. यावेळी शोभनाने गोलंदाजी करताना पहिल्या चार चेंडूत चारच धावा देताना पुजा वस्त्राकरला बादही केले. तसेच तिने शेवटच्या दोन चेंडूतही दोनच धावा दिल्या. त्यामुळे बेंगलोरने हा रोमांचक सामना जिंकला.

यावेळी शेवटचा चेंडू टाकल्यानंतर बेंगलोरचा विजय निश्चित झाल्यानंतर शोभनाने 'मी आहे, शांत रहा,' अशा अर्थाचे हावभाव करत सेलिब्रेशन केले.

विशेष म्हणजे अशाचप्रकारे 2020 आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स संघातच झालेल्या सामन्यात सूर्यकुमारनेही असेच सेलिब्रेशन केले होते. त्यावेळी त्याने बेंगलोरविरुद्ध मुंबईसाठी खेळताना नाबाद 79 धावांची खेळी केली होती.

त्यानेच विजयी चौकारही ठोकला होता. त्यावेळी त्यानेही 'मी आहे' अशा अर्थाचे सेलिब्रेशन केले होते. त्याच सामन्यात विराट आण सूर्यकुमार यांच्यात झालेली स्लेजिंगची घटनाही बरीच चर्चेत राहिली होती.

Asha Sobhana celebration | Suryakumar Yadav | WPL 2024
T20 World Cup 2024 : पाऊस अन् वादळानंतरही सामन्याचा निकाल लागणार! सेमीफायनल अन् फायनलसाठी ICC ची मोठी घोषणा

दरम्यान, बेंगलोरने हा सामना जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता अंतिम सामन्यात त्यांची लढत दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. दिल्लीने गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवत थेट अंतिम सामना गाठला होता. त्यामुळे यावेळी डब्ल्युपीएलला नवा विजेता मिळणार आहे.

एलिमिनेटर सामन्यात बेंगलोरने एलिस पेरीने केलेल्या 66 धावांच्या जोरावर 20 षटकात 135 धावा केल्या होत्या. हेली मॅथ्युज, नतालिया सायव्हर-ब्रंट आणि सायका इशाक यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 136 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 6 बाद 130 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने 33 धावांची खेळी केली. बेंगलोरकडून श्रेयंका पाटीलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.