IPL 2025: तब्बल ९ वर्षांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा शिलेदार सोडणार संघाची साथ?

Delhi Capitals: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या लिलावापूर्वी अनेक फ्रँचायझी संघाच्या निगडीत मोठे बदल करताना दिसत आहेत. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघही आहे.
Delhi Capitals Coach
Delhi Capitals CoachSakal
Updated on

IPL 2025 News: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या लिलावापूर्वी अनेक संघ आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल करताना दिसत आहेत. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघही आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्ली आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यातील करार संपुष्टात आला.

त्यानंतर दिल्लीने हेमांग बदानी यांना मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली. तसेच वेणुगोपाल राव यांच्याकडे क्रिकेट संचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली. आता दिल्लीबरोबर ९ वर्षांपूर्वी जोडले गेलेल्या मुंबईच्या प्रवीण आमरे हे देखील संघाची साथ सोडण्याची शक्यता आले. प्रवीण आमरे सध्या दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत.

Delhi Capitals Coach
IPL 2025 Auction पूर्वी मुंबई इंडियन्सने खेळली मोठी खेळी; फ्रँचायझी वेगळीच डिल करण्याच्या प्रयत्नात...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.