Australia vs India 1st Test: कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस वेगळा असू शकतो, त्यामुळे खेळाडूंचीही कसोटी लागते, असं म्हटलं जातं. याचा प्रत्येय शुक्रवारपासून (२२ नोव्हेंबर) सुरु झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील पर्थ कसोटीतही आला. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा पहिलाच सामना आहे.
पहिल्याच सामन्याच्या पहिल्या दिवशी तब्बल १७ विकेट्स गेल्या होत्या. पण दुसऱ्या दिवशी मात्र अवघ्या ३ विकेट्स गेल्या.
दुसऱ्या दिवस अखेर भारतीय संघाने दुसऱ्या डावात ५७ षटकात बिनबाद १७२ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघ दिवस अखेर २१८ धावांनी आघाडीवर आहे. भारताचा दुसरा डाव शनिवारी दुसऱ्या सत्रात सुरू झाला.