AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

IND vs AUS Perth Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाज पहिल्याच दिवशी संघर्ष करताना दिसले. भारताला पहिल्या डावात १५० धावाच करता आल्या.
Virat Kohli | India vs Australia Test
Virat Kohli | India vs Australia TestSakal
Updated on

Border - Gavaskar Trophy 1st Test: भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. पण कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर पहिला कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू झाला आहे.

या सामन्याच्या पहिल्याच दिवशी टी ब्रेक होण्यापूर्वी भारतीय संघ सर्वबाद झाला आहे. भारताने ४९.४ षटकात सर्वबाद १५० धावा केल्या. भारताकडून पदार्पणवीर नितीश कुमार रेड्डी, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांनीच बऱ्यापैकी झुंज दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.