AUS A vs IND A: भारतीय महिलांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट पराभवाने, कसोटी सामन्यात यजमानांचा विजय

India A vs Australia A Women: भारतीय महिला अ क्रिकेट संघाची अपयशाची मालिका कायम राहिली असून कसोटी सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
India A Women Team
India A Women TeamSakal
Updated on

India A vs Australia A Women Test: भारतीय महिला अ क्रिकेट संघाची ऑस्ट्रेलियन दौऱ्याची सांगताही अपयशाने झाली. टी-२० व एकदिवसीय मालिकेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला अ संघाला येथे पार पडलेल्या चार दिवसीय कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियन अ संघाकडून ४५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दोन देशांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळवण्यात आला.

ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात २१२ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारत अ संघाला १८४ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलिया अ संघाकडून दुसऱ्या डावात २६० धावा फटकावण्यात आल्या. त्यामुळे भारतीय महिला अ संघासमोर विजयासाठी २८९ धावांचे आव्हान ठेवले गेले.

India A Women Team
T20 World Cup साठी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; एलिसा हेली कर्णधार, तर 'या' खेळाडूकडे उपकर्णधारपद
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.