ऑस्ट्रेलियाची T20 मालिकेत विजयी आघाडी, जोश इंग्लिसचे ताबडतोड शतक, तर स्टॉयनिसही चमकला

Australia beat Scotland : स्कॉटलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडवर ७० धावांनी विजय मिळवला आहे.
josh englis and M. stoinis
josh englis and M. stoinisesakal
Updated on

Australia vs Scotland: ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडविरुद्ध दुसरा ट्वेंटी-२० सामना जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने पहिला सामना ६ विकेट्स आणि ६२ चेंडू राखून जिंकला, तर दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने ७० धावांनी स्कॉटलंडवर विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडला १९७ धावांचे आव्हान दिले होते. परंतु ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी स्कॉटलंडचा डाव १२६ धावांवरच संपवला. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जोश इंग्लिसने ४९ चेंडूंमध्ये १०३ धावांची शतकीय खेळी केली, तर गोलंदाज मार्कस स्टॉयनिसने ३.४ षटकांमध्ये २३ धावा देत ४ विकेट्स घेतले. या सामन्यात ब्रँडन मॅकम्युलनच्या अर्धशतकीय खेळीव्यतिरिक्त स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही .

josh englis and M. stoinis
विजय मिळाला पण आयर्लंडने घाम फोडला दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात २२५ धावा करूनही भारताची चार धावांनी सरशी

स्कॉटलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅव्हिस हेडने २५ चेंडूंमध्ये ८० धावांची अर्धशतकी खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने १२ चौकारांसह ५ षटकार ठोकले होते. तर गोलंदाज शॉन ॲबॉटने ३ विकेट्स घेतले होते. या सामन्यात स्कॉटलंडचे १५५ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने ९.४ षटकांमध्ये पूर्ण केले.

दोन ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे आणि अंतिम सामन्यात स्कॉटलंडला मालिकेत व्हाईटवॉश करण्याची संधी आहे.

josh englis and M. stoinis
Champions Trophy 2025 पूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी घडामोड; Babar Azam च्या हकालपट्टीचा प्लान तयार, संघातच प्रतिस्पर्धी

स्कॉटलंड मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया ११ सप्टेंबर पासून इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका व ५ सामन्यांची वन-डे मालिका खेळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.