ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाने वन-डे मधील पाकिस्तानच्या विक्रमाची लावली वाट; इंग्लंडविरुद्ध दिसला थाट

Australia vs England: इंग्लंडविरूद्ध वन-डे मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून अनेक विक्रम मोडले.
australia win
australia winesakal
Updated on

Australia and England records in ODI cricket: इंग्लंड विरूद्ध वन-डे मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचे ३१६ धावांचे लक्ष्य केवळ ४४ षटकांमध्ये पूर्ण केले. या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरूद्ध यशस्वी पाठलाग केलेली ही पाचवी सर्वोत्तम धावसंख्या आहे.

ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड लढतीतील विक्रम

एकाच वन-डे सामन्यात ५०+ धावा, ३+ विकेट आणि ४+ झेल करणारा मार्नस लाबुशेन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला आहे.

वन डे मध्ये ऑस्ट्रेलियाचा यशस्वी धावांचा पाठलाग

३५९ विरूद्ध भारत, मोहाली, २०१९

३३४ विरूद्ध इंग्लंड, सिडनी, २०११

३३० विरूद्ध दक्षिण आफ्रिका, गकेबेर्हा, २००२

३१६ विरूद्ध पाकिस्तान, लाहोर, १९९८

३१६ विरूद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम, २०२४

australia win
IND vs BAN 1st Test : मानलं अण्णा! R Ashwin च्या दमदार खेळीने भारताला सावरले, पण आज गणित गंडले, ऑल आऊट झाले

एका वन डे सामन्यात वन डेत इंग्लंडच्या फिरकीपटूंनी टाकलेली सर्वाधिक षटकं

३६.० षटकं विरूद्ध पाकिस्तान, शारजाह, १९८५

२८.३ षटकं विरूद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, २०१८

२८.० षटकं विरूद्ध वेस्ट इंडिज, सिडनी, १९७९

२८.० षटकं विरूद्ध ऑस्ट्रेलिया, नॉटिंगहॅम, २०२४

वन डे सामन्यांमध्ये सलग विजय मिळवणारे संघ

२१ - ऑस्ट्रेलिया (जानेवारी २००३ - मे २००३)

१३ - श्रीलंका (जून २०२३ - सप्टेंबर २०२३)

१३ - ऑस्ट्रेलिया (ऑक्टोबर २०२३ - सुरू आहे)

१२ - दक्षिण आफ्रिका (फेब्रुवारी २००५ - ऑक्टोबर २००५)

१२ - पाकिस्तान (नोव्हेंबर २००७ - जून २००८)

१२ - दक्षिण आफ्रिका (सप्टेंबर २०१६ - फेब्रुवारी २०१७)

१०० वन डे सामन्यांमध्ये फिरकीपटूंच्या सर्वाधिक विकेट्स

१८९ - सकलेन मुश्ताक (पाकिस्तान)

१७९ - राशिद खान (अफगाणिस्तान)

१७२ - ॲडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया)

१६७ - कुलदीप यादव (भारत)

१६६ - इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका)

१६२ - सईद अजमल (पाकिस्तान)

australia win
IND vs BAN 1st Test: रोहितकडून Mohammad Siraj वर अन्याय, नेटिझन्स नाराज; पण, बांगलादेशला दिसले 'आकाश' Video

ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड वन-डे सामन्यातील सर्वाधिक वैयक्तिक धावा

१६१ - शेन वॉटसन, मेलबर्न, २०११

१५४ - ट्रॅव्हिस हेड, नॉटिंगहॅम, २०२४

१५२ - ट्रॅव्हिस हेड, मेलबर्न, २०२२

१४५ - डीन जोन्स, ब्रिस्बेन, १९९०

१४३ - शेन वॉटसन, साऊदहॅम्पटन, २०१३

एका वन-डे डावात सर्वाधिक चौकार मारणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू

२४ - डेव्हिड वॉर्नर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केप टाऊन, २०१६

२१ - ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध अफगाणिस्तान, वानखेडे, २०२३

२० - ट्रॅव्हिस हेड विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम, २०२४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.