IND vs AUS Test: भारताविरुद्धची कसोटी मालिका ॲशेसएवढीच प्रतिष्ठेची; मिचेल स्टार्क नक्की काय म्हणाला, वाचा

Mitchell Starc on Border-Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेबाबत मिचेल स्टार्कने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Mitchell Starc
Mitchell StarcSakal
Updated on

Mitchell Starc Compares Border-Gavaskar Trophy to Ashes Series : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षाच्या अखेरीस होणारी कसोटी मालिका तीन दशकांनंतर प्रथमच पाच कसोटी सामन्यांची होणार आहे.

गावसकर-बॉर्डर करंडकासाठी होणारी ही मालिका आमच्यासाठी ॲशेस मालिकेऐवढीच मोलाची आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने व्यक्त केले आहे.

१९९१-९२च्या मोसमात या दोन संघांत पाच कसोटी सामन्यांची मालिका झाली होती. यावेळी भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात जाणार आहे. ऑस्ट्रेलिया संघासाठी आतापासूनच वेध लागले आहेत, कारण गेल्या दोन दौऱ्यांत भारताने मालिका २-१ अशा फरकाने जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे.

Mitchell Starc
R Sridhar : भारताचा चॅम्पियन 'गुरु' अफगाणिस्तान संघाला मदत करणार; क्रिकेट बोर्डाची घोषणा

ही मालिका पाच सामन्यांची असल्यामुळे आमच्यासाठी ॲशेस मालिकेऐवढेच महत्त्व असणार आहे, असे स्टार्क म्हणतो. २०१८-१९ आणि २०२०-२१ अशा दोन दौऱ्यांत मायदेशात अपयश आलेल्या ऑस्ट्रेलियाला गावसकर-बॉर्डर करंडक २०१४-१५ जिंकता आलेला नाही, त्यामुळे यंदाची मालिका त्यांनी अधिकच प्रतिष्ठेची केली आहे.

भारतीय संघाची ताकद आम्हाला माहीत आहे, त्यामुळे मायदेशातील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत, असे स्टार्कने सांगितले. जागतिक कसोटी अंतिम सामन्याच्या दृष्टीने दोघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. सध्याच्या क्रमवारीनुसार भारत पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.

आम्ही दोघेही पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असल्यामुळे ही मालिका चुरशीची होईल. प्रेक्षकांसह खेळाडूंचीही उत्सुकता वाढली आहे. मालिकेच्या अखेरच्या दिवशी म्हणजे ८ जानेवारी रोजी हा करंडक आमच्या शोकेसमध्ये ठेवायचा आहे, असे स्टार्क म्हणतो.

Mitchell Starc
Para Olympic च्या आखाड्यात माणदेशातील दोन रत्ने; गोळाफेकीत सचिन खिलारी, तर बॅडमिंटनमध्ये सुकांत कदम सहभागी होणार

१००वा कसोटी सामना खेळण्यापासून स्टार्क ११ सामने दूर आहे, कसोटी सामन्यातून निवृत्त होण्याचा विचार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. कसोटी क्रिकेटमधील कारकीर्द लांबवण्यासाठी कदाचित व्हाईटबॉल क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करत असल्याचे त्याने म्हटले आहे.

जेव्हा जेव्हा बॅगी ग्रीन (कसोटी कॅप) डोक्यावर परिधान करतो तेव्हा वेगळीच ऊर्जा आणि सन्मान मिळतो. १०० कसोटी सामने खेळू शकलो तर तो माझ्यासाठी मोठा गौरव असेल, असे स्टार्कने सांगितले.

स्टार्कच्या मनात सध्या भारताविरुद्धच्या कसोटीचा विचार सुरू झालेला असला तरी तो पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये व्हाईटबॉल क्रिकेट मालिका खेळण्यास जाणार आहे. त्यानंतर भारताविरुद्धच्या मालिकेची तयारी करण्यासाठी मायदेशात न्यू साऊथ वेल्सकडून शेफिल्ड शील्ड या देशांतर्गत राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे.

पुढच्या काळात आम्ही सात कसोटी सामने खेळणार आहोत. त्यातील पाच कसोटी भारताविरुद्ध आणि दोन कसोटी श्रीलंकेविरुद्धच्या आहेत, असे स्टार्क म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.