Alyssa Healy Opposes Women's T20 World Cup in Bangladesh: बांगलादेशमध्ये ऑक्टोबरमध्ये नियोजित असलेल्या महिला ट्वेन्टी-२० स्पर्धेत खेळणे आता उचित ठरणार नाही, संपूर्ण देश संकटातून जात आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात झालेल्या आंदोलनाचा फटका बसलेला आहे, त्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झालेला आहे, असे मत ऑस्ट्रेलियाची कर्णधार अलिसा हिली हिने व्यक्त केले.
आंदोलन आणि हिंसाचाराचा फटका बसल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी हा देश सोडला. आता तेथील लष्कराने मुहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली सरकार तयार केले आहे.
याच बांगलादेशमध्ये ३ ते १९ ऑक्टोबरदरम्यान महिला ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा नियोजित आहे. त्यात १० संघांचा समावेश असून ऑस्ट्रेलियाचा संघ गतविजेता आहे.