Australia beat Pakistan in 3rd T20I: ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानवर ७ विकेट्स व ५२ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ११७ धावांत तंबूत पाठवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ११.२ षटकांत ३ बाद ११८ धावा करून विजय मिळवला.
मार्कस स्टॉयनिसने (Marcus Stoinis) २७ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा हा पाकिस्तानविरुद्ध सलग सातवा ट्वेंटी-२० विजय आहे आणि ही सर्वाधिक सलग विजयाची मालिका आहे. न्यूजीलंडने २०२३-२४ या कालावधीत पाकिस्तानला सलग ६ ट्वेंटी-२० सामन्यांत पराभूत केले होते.