ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला त्यांच्याच घरात सलग दुसऱ्या वनडेत पाजलं पराभवाचं पाणी; गोलंदाजांचा विजयात मोलाचा वाटा

AUS vs ENG second ODI : इंग्लंडविरूद्ध सलग २ वन -डे सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेमध्ये घेतली आघाडी.
england vs Australia
england vs Australiaesakal
Updated on

Australia vs England : वन -डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर धुंवाधार विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात ७ विकेट्सने इंग्लंडवर मात केल्यानंतर दुसरा सामनाही ऑस्ट्रेलियाने ६८ धावांनी आपल्या नावे केला आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेमध्ये सलग २ सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेमध्ये २-० आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजीसाठी आलेले मॅथ्यू शॉर्ट आणि ट्रॅव्हिस हेड प्रत्येकी २९ धावा करून परतले, तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार मिचेल मार्शने ५९ चेंडूत ६० धावांची संघाला सावरणारी खेळी केली. त्याला ६७ चेंडूत ७४ धावा करणाऱ्या ऍलेक्स कॅरीची साथ मिळाली. या अर्धशतकीय खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला २७० धावा उभारता आल्या.

england vs Australia
भयंकर अपघातातून वाचला अन् मेहनतीने केले पुनरागमन; Rishabh pant बद्दल काय म्हणाला Shubman Gill ?

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सला ३ विकेट्स घेण्यात यश आले. गोलंदाज मॅथ्यू पोट्स, जेकब बेथेल व आदिल रशिद यांना प्रत्येकी २ विकेट्स मिळाले. तर ऑली स्टोनला १ विकेट मिळाला.

२७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीवीरांना फारशी चांगली कामगीरी करता आलेली नाही. फील सॉल्ट (१२), तर बेन डकेट (३२) धावा करत माघारी परतला. जेमी स्मिथचे अर्धशतक एका धावेने हुकले आणि इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला जास्त वेळ मैदानावर टीकता आले नाही.

england vs Australia
On This Day: दीडशे वर्षांच्या इतिहासात दोनच कसोटी मॅच 'टाय', ज्यात भारताच्याही सामन्याचा समावेश; जाणून घ्या त्याबद्दल

इंग्लंडचा डाव ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी २०२ धावांवरच गुंडाळला. दरम्यान वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला ३ विकेट्स घेता आले. जोश हेझलवूड, ऍरॉन हार्डी व ग्लेन मॅक्सवेलला प्रत्येकी २ विकेट्स मिळाले, तर ॲडम झम्पाने १ विकेट घेतला.

इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचा पुढील वन-डे सामना २४ सप्टेंबर रोजी असून इंग्लंडला मालिकेमध्ये टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.