Tim Paine
Tim Paineesakal

IND vs ENG : मी तुमचं दुःख समजू शकतो... भारताच्या 'ब' संघाकडून हरणाऱ्या इंग्लंडला कोणी काढला चिमटा?

Published on

IND vs ENG Tim Paine Comment : इंग्लंडने पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर भारताविरूद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका 4-1 अशी गमावली. भारताचे प्रमुख खेळाडू या मालिकेत खेळले नव्हते तरी देखील इंग्लंडचा दारूण पराभव झाला. पाचवा कसोटी सामना तर भारताने एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. हा कसोटी सामना अवघ्या तीन दिवसात संपला.

या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टिम पेनने इंग्लंडच्या संघाला चिमटा काढला. भारताने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात 2-1 असा पराभवाचा धक्का दिला होता. त्यावेळी टीम पेन हा कांगारूंचा कर्णधार होता. त्यावेळी देखील भारताचे प्रमुख खेळाडू हे दुखापतींमुळे कसोटी मालिकेला मुकले होते. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील युवा संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.

Tim Paine
Rohit Sharma Retirement : ...तर मी थेट निवृत्ती घेईन! पाचव्या कसोटीनंतर कर्णधार रोहित शर्माने दिली मोठी हिंट

इंग्लंडही भारताच्या ब संघाकडून 4-1 असा हरल्यानंतर टीम पेनने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'मला माहिती आहे की भारताच्या ब संघाकडून हरल्यावर कसं वाटतं. आमच्यासोबत आमच्याच देशात असं झालं होतं.'

पेनने ब्रॅड हेडिनसोबत एका पॉडकास्टमध्ये संवाद साधताना हे वक्तव्य केलं. तो म्हणाला की, 'भारताचे काही मोठे खेळाडू या मालिकेत देखील नव्हते. याचा फायदा इंग्लंडला मिळायला हवा होता.'

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली, मोहम्मद शमी, केएल राहुल अन् ऋषभ पंत सारेखे खेळाडू नव्हते. तरी देखील भारताने मालिका 4-1 अशी जिंकली. ब्रँडन मॅक्युलम प्रशिक्षक झाल्यापासून आणि बेन स्टोक्स कर्णधार झाल्यापासून इंग्लंडने पहिल्यांदाच कसोटी मालिका गमावली आहे.

Tim Paine
Ravichandran Ashwin IND vs ENG : आता लोक काय म्हणतील याची भीती नाही... अश्विन 100 व्या कसोटीनंतर असं का म्हणाला?

याबाबत पेन म्हणाला की, 'मला इंग्लंडला खेळताना आणि हरताना देखील पाहून आनंद होतो. इंग्लंडचा संघ चांगले मनोरंजन करतो.

ब्रॅड हेडिन म्हणाला की, 'या मालिकेत भारतीय संघ मजबूत नव्हता. मात्र त्यांना दाखवून दिलं की भारतीय क्रिकेट सर्किटमध्ये किती डेप्थ आहे. भारतीय क्रिकेटमधील पुढच्या पिढीतील काही मोठी नावे या मालिकेतून समोर आली आहे. यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेलने दमदार कामगिरी केली आहे.'

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.