AUS vs AFG T20 Series : तालिबानी शासन, आम्ही खेळणार नाही! ऑस्ट्रेलियाने पुन्हा टाळली अफगाणिस्तानसोबतची मालिका

AUS Vs AFG
AUS Vs AFG Esakal
Updated on

AUS vs AFG T20 Series Taliban Regime : ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानसोबतची टी 20 मालिका पुन्हा एकदा टाळली आहे. यापूर्वी देखील ऑस्ट्रेलियाने 14 महिन्यापूर्वी अफगाणिस्तानसोबतची मालिका टाळली होती. दोन्ही मालिका या वेगवेगळ्या असल्या तरी ऑस्ट्रेलियाने त्या टाळण्याचे कारण मात्र एकच आहे. ते म्हणजे तालिबान!

अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य आल्यापासून ऑस्ट्रेलिया त्यांच्या क्रिकेट संघाविरूद्ध क्रिकेट मालिका खेळण्यात रस दाखवत नाहीये. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्षी ऑगस्ट महिन्यात 3 टी 20 सामन्यांची मालिका होणार होती. या मालिकेचे यजमानपद हे अफगाणिस्तानकडे होते. याचा अर्थ हा मालिका युएईमध्ये झाली असती.

AUS Vs AFG
AUS vs IND, Test: टीम इंडिया वर्ष अखेरीस करणार ऑस्ट्रेलिया दौरा! 'या' ठिकाणी होणार कसोटी सामने?

तालिबानविरूद्ध ऑस्ट्रेलियाची कडक भुमिका

ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरूद्ध टी 20 मालिका न खेळण्याची निर्णय हा तेथील तालिबानी राजवटीविरूद्ध निषेध म्हणून घेतला आहे. याच कारणामुळे गेल्या वर्षी देखील ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरूद्ध क्रिकेट मालिका खेळण्यास नकार दिला होता.

खेळात महिलांनी मोठ्या प्रमाणावर भाग घ्यावा याचे क्रिकेट ऑस्ट्रेलिया समर्थन करते. मात्र तालिबान याच्या विरूद्ध असून अफगाणिस्तानातील तालिबानच्या कब्ज्यातील भागात महिलांना फारसे स्वातंत्र्य नाही.

AUS Vs AFG
Navjot Singh Sidhu : ठोको ताली! लोकसभा नाही तर IPL च्या मैदानात नवज्योत सिंग सिद्धूची एन्ट्री... बदलली भूमिका

तिसऱ्यांदा दिला नकार

गेल्या 14 महिन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरूद्धची मालिका टाळण्याची ही पहिलीच वेळ असली तरी एकूण तीनवेळा ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला आहे. त्यांनी 2021 मध्ये एकमेव कसोटी सामना खेळण्यास नकार दिला. जानेवारी 2023 मध्ये वनडे मालिका खेळण्यास नकार दिला. आता तीन 3 टी 20 सामन्यांची मालिका देखील खेळण्यास नकार दिला आहे.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.