IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ३-१ अशा फरकाने टीम इंडियाला नमवणार; रिकी पाँटिंगचा दावा

Border-Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधाराने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत कांगारूंचे पारडे जड असल्याची भविष्यवाणी केली आहे. ५ सामन्यांची ही मालिका ऑस्ट्रेलिया जिंकेल असा दावा त्याने केला आहे.
India vs Australia Ricky Pointing
India vs Australia Ricky Pointingesakal
Updated on

India vs Australia Test Series Ricky Ponting: भारतीय क्रिकेटपटू सध्या ४३ दिवसांच्या विश्रांतीवर आहेत. श्रीलंकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर आता भारतीय संघ थेट १९ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला उतरणार आहे. भारत-बांगलादेश यांच्यातल्या कसोटी मालिकेतून टीम इंडियाच्या मालिकांना सुरुवात होईल आणि त्यानंतर लागोपाठ क्रिकेट पाहायला मिळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने या मालिकेला महत्त्व आहे आणि भारताला एकूण ९ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी ५ कसोटी या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत आणि त्यावर आतापासूनच ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी विजयाचा दावा करण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय संघाने मागील दोन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि ३३ वर्षांत प्रथमच दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. १९९१-९२ मध्ये उभय संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. १९९९ मध्ये तीन सामन्यांची मालिका झाली होती, त्यानंतर चार सामन्यांची मालिका होऊ लागली. पण, आता पुन्हा ५ सामन्यांची मालिका होणार आहे.

२०१७ पासून भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे कायम राखली आहे आणि ऑस्ट्रेलियात सलग दोनवेळा कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात २०१९ मध्ये भारताने २-१ अशी मालिका जिंकली होती आणि त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली २०२०-२१ मध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवला होता.

India vs Australia Ricky Pointing
नोकरी करण्यासाठी क्रिकेट सोडलं! न्यूझीलंडच्या फलंदाजाची अचानक निवृत्ती

माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या मते यावेळी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने निकाल लागेल असे म्हटले आहे. भारतविरुद्धची ५ सामन्यांची मालिका ऑसी जिंकतील, कारण ऑसी संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्याच्या त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये परतले आहेत, असा दावा पाँटिंगने केला.

"ही एक स्पर्धात्मक मालिका असणार आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे मागील दोन मालिकांमध्ये भारताने जे ऑस्ट्रेलियात करून दाखवले, आता ऑस्ट्रेलियन संघाला पलटवार करण्याची संधी आहे. आम्ही पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत परतलो आहोत. गेल्या दोन-तीन वेळा फक्त चार कसोटी सामन्यांच्या मालिका झाल्या आहेत. प्रत्येकजण या मालिकेसाठी खूप उत्साही आहे,''असे त्याने आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये सांगितले.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ( India vs Australia, Border-Gavaskar Trophy 2024-25)

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, पहिली कसोटी: २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, दुसरी कसोटी: ६ ते १० डिसेंबर, एडिलेड

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, तिसरी कसोटी: १४ ते १८ डिसेंबर, ब्रिस्बेन

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, चौथी कसोटी: २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, पाचवी कसोटी: ३ ते ७ जानेवारी, २०२५, सिडनी

India vs Australia Ricky Pointing
Ben Stokes: बेन स्टोक्सला पुन्हा दुखापत, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून माघार

"मी ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी निश्चितच सल्ला देणार आहे. मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बोलणार नाही. काही सामने ड्रॉ होतील किंवा कुठेतरी खराब हवामान असेल. पण, ऑस्ट्रेलिया ही मालिका ३-१ अशी जिंकेल, " असे पाँटिंग म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.