Border - Gavaskar Trophy 2024-25: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही कसोटी मालिका आजपासून (२२ नोव्हेंबर) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियम (Perth Stadium) येथे होत आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा अनुपस्थित आहे. त्यामुळे त्याच्याजागेवर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्या सामन्यातून अष्टपैलू २१ वर्षीय नितीश कुमार रेड्डी आणि २२ वर्षीय हर्षित राणा यांचे पदार्पण झाले आहे.