Matthew Wade: स्टार ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची फर्स्ट-क्लास क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, टी20 वर्ल्डकप खेळणार का?

Matthew Wade Retirement: ऑस्ट्रेलियाच्या स्टार विकेट किपरने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Matthew Wade Retirement
Matthew Wade RetirementX/cricketcomau
Updated on

Matthew Wade retirement: ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने प्रथम श्रेणी आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मार्श शेफिल्ड शिल्डच्या अंतिम सामन्यापूर्वी त्याने ही घोषणा केली आहे.

त्याचा संघ तास्मानियाला साऊथ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना वेडचा अखेरचा प्रथम श्रेणी सामना असणार आहे. याच सामन्यामुळे वेड गुजरात टायटन्सच्या आयपीएल 2024 मधील पहिल्या दोन सामन्यांनाही मुकणार आहे.

दरम्यान, वेडने जरी कसोटीतून निवृत्ती घेतली असली, तरी तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये (वनडे आणि टी20) खेळणे सुरू ठेवणार आहे. तसेच जून 2024 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपमध्येही तो ऑस्ट्रेलिया संघात असण्याची दाट शक्यता आहे.

Matthew Wade Retirement
IPL 2024: पंत परत आला, पण दिल्लीला बसतायेत धक्क्यांवर धक्के! ब्रुकनंतर 'हा' प्रमुख गोलंदाजही संपूर्ण हंगामातून बाहेर

वेडने नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध गेल्या महिन्यात झालेल्या टी20 मालिकेत मिचेल मार्शच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रभारी नेतृत्व केले होते. वेडने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाला टी20 वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

दरम्यान वेडने ऑस्ट्रेलियाकडून 36 कसोटी सामनेही खेळले आहेत. मात्र त्याला कसोटी संघात त्याचे स्थान पक्के करण्यात अपयश आले होते. त्याने 2012 ते 2021 दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून खेळलेल्या 36 कसोटीत 4 शतके आणि 5 अर्धशतकांसह 1613 धावा केल्या आहेत.

तसेच वेड देशांतर्गत क्रिकेटमध्ये तास्मानिया शिवाय विक्टोरिया संघाकडूनही खेळला आहे. त्याला व्हिक्टोरिया संघाकडून खेळताना कर्णधार आणि खेळाडू म्हणून मोठे यश मिळाले. त्याने व्हिक्टोरिया संघाकडून 4 वेळा मार्श शेफिल्ड शिल्ड स्पर्धा जिंकली. यातील दोन विजेतीपदे त्याने कर्णधार म्हणूनही जिंकली आहेत.

Matthew Wade Retirement
Ranji Trophy: रहाणेच्या 'त्या' कृतीने धवल कुलकर्णी भावूक, शेवटच्या विकेटसह मुंबईला जेतेपद मिळवून देताच डोळेही पाणावले

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील निवृत्तीबद्दल वेड म्हणाला, 'मी माझे कुटुंब, माझी पत्नी जुलिया आणि मुलं विंटर, गोल्डी आणि ड्युक यांनी माझ्या संपूर्ण कारकिर्दीदरम्यान ऑस्ट्रेलियाभर आणि जगभर फिरत असताना केलेल्या त्यागाबद्दल आभार मानतो.'

'मी क्रिकेटच्या सर्वात लांब प्रकारात आलेल्या आव्हानांचा आनंद घेतला आहे. तरी मी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत राहिल. मी ऑस्ट्रेलियाची बॅगी ग्रीन कॅप घालणे ही माझ्या कारकिर्दीतील महत्त्वाचाच भाग राहिल.'

वेडने त्याच्या कारकिर्दात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 165 सामने खेळले असून 40.81 च्या सरासरीने 9183 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 19 शतकांचा आणि 54 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच यष्टीरक्षक करताना 463 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.