ENG vs AUS 5th ODI : ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली; ट्रॅव्हिस हेडने अष्टपैलू कामगिरी

ENG VS AUS: ऑस्ट्रेलियाने पाचवा सामना DLS नुसार जिंकून मालिका ३-२ ने जिंकली.
END vs AUS
END vs AUSesakal
Updated on

ENG VS AUS 5th ODI: ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील पाचवा वन डे सामना जिंकला आणि इंग्लंडविरुद्धची मालिका ३-२ ने जिंकली. ऑस्ट्रेलियाने सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. पण, यजमानांनी पुढील दोन सामने जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. पाचव्या वन डे सामन्यात ऑसींचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथने केले.

अंतिम सामन्यासाठी मिचेल मार्श तंदुरूस्त नसल्यामुळे कर्णधारपद अनुभवी स्टीव्ह स्मिथकडे दिले गेले. स्मिथने नाणेकेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडकडून सलामीवीर फिल सॉल्ट आणि बेन डकेटने स्पोटक फलंदाजीने सामन्याला सुरूवात केली. परंतु ७व्या षटकात ऑस्ट्रेलियन गोलंदाज ऍरॉन हार्डीने सॉल्टला ४५ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर फलंदाजीसीठी आलेल्या विल जॅक्सला देखील हार्डीने शून्यावर बाद केले. परंतु त्यानंतर कर्णधार हॅरी ब्रूकने डकेटला साथ देत चांगली फलंदाजी केली. या दोघांच्या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली.

END vs AUS
IND vs BAN 2nd Test : ५२ धावांची आघाडी अन् टीम इंडियाने केला डाव घोषित, कारण काय तर...

२५व्या षटकात ॲडम झॅम्पाच्या गोलंदाजीवर ब्रूकला ७२ धावांची अर्धशतकी खेळी करत परतावे लागले. त्यानंतर इंग्लंड संघाचा डाव गडगडायला सुरूवात झाली. परंतु, डकेटने एका बाजूने खेळ लावून धरत शतक पूर्ण केले. डकेटने या खेळीमध्ये १३ चौकार व २ षटकारांसह १०७ धावा केल्या. इंग्लंडने सर्व विकेट्स गमावत ऑस्ट्रेलियाला ३१० धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅव्हिस हेड गोलंदाजीत कमाल करताना ४ विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाच्या २०.४ षटकांत १६५ धावा झाल्या असताना पावसाची हजेरी लागली आणि पुढे सामना होऊ शकला नाही. DLSनुसार ऑस्ट्रेलियाला २०.४ षटकांत ११७ धावांचे टार्गेट असले असले आणि कांगारूंचा संघ ४९ धावांनी पुढे होता. त्यामुळे त्यांना विजयी घोषित केले गेले. सलामीवीर मॅथ्यू शार्ट (५८)ने अर्धशतक झळकावले, तर ट्रॅव्हिस हेड ३१ धावा करत परतावे लागले. कर्णधार स्टीव्ह स्मिथ (३६) व जोश इंग्लिसने (२६) धावांची नाबाद खेळी करत सामना जिंकला. सामन्यात ३१ धावा व ४ विकेट्स घेणारा ट्रॅव्हिस हेड सामनावीर ठरला. त्याबरोबर मालिकावीराचा मानही हेडलाच मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.